27 April 2024 3:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विषाची परीक्षा | लोकसभा-विधानसभा बंद पण सरकार शाळा सुरु करण्याच्या विचारात?

Coronavirus, Reopen Schools, Educational Institutes

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट : भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

शाळा सुरु करताना सरकारचा प्लॅन नेमका कसा असू शकतो?

  • दहावी ते बारावी या वयोगटातल्या शाळा आधी सुरु होऊ शकतात.
  • नंतर पाचवी ते दहावीचे वर्ग सुरु होऊ शकतात
  • शाळा दोन शिफ्टमध्ये चालवाव्यात…एक सकाळची शिफ्ट आणि दुसरी दुपारची शिफ्ट
  • दोन शिफ्टच्या मध्ये एक तासांचं अंतर असावं, ज्यात वर्ग सॅनिटायझ करण्यात येतील
  • पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्ग सुरु करण्याबाबत मात्र इतक्यात केंद्राचीही अनुकूलता नाही.
  • अर्थात शाळा सुरु करण्याबाबत केंद्राने गाईडलाईन्स केल्या तरी अंतिम निर्णय हा राज्य सरकारांवरच सोपवला जाणार आहे. त्या त्या ठिकाणी कशी स्थिती आहे
  • त्यानुसार राज्य सरकारं हा निर्णय घेतील, असंही केंद्राने म्हटलं आहे. जुलैमध्ये केंद्राने याबाबत जेव्हा सर्व्हे केला होता, तेव्हा बहुतांश पालकांनी शाळा सुरु
  • करण्यास विरोधच दर्शवला होता. त्यामुळे बदलत्या स्थितीत त्यावर कसा प्रतिसाद येतो हे देखील पाहावं लागेल.

शाळा सरु करण्यासाठी केंद्र सरकारने स्वित्झर्लंडचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही सलग इतका काळ शाळा बंद असणं हे मुलांसाठी चांगलं नाही, असं म्हटलं आहे. इतका मोठा गॅप शाळेविषयी, अभ्यासाविषयी अनास्था निर्माण करु शकतो. शिवाय मुलींच्या बाबतीत बालविवाहासारखे प्रकारही ग्रामीण भागात वाढू शकतात, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने 1 जूनपासूनच अनलॉकची घोषणा करत काही गोष्टी टप्प्याटप्याने उघडायला सुरुवात केली. पण शाळा, कॉलेजेस, मेट्रो, लोकल यांचा यात समावेश झालेला नाही. पण कोरोना पूर्ण जाईपर्यंत या गोष्टी थांबवणंही शक्य नाही. शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्याने इतर अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच आता याबाबत अंतिम निर्णय काय होतो आणि त्यावर राज्य सरकारांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

 

News English Summary: The central government plans to reopen schools and educational institutions that were closed in the wake of the Corona. The center plans to start the school in phases from September 1 to September 14. After the end of the lockdown on August 31, the Central Government will relax the restrictions and issue new guidelines.

News English Title: Coronavirus Phase Wise Plan To Reopen Schools And Educational Institutes From September 1 And November 14 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x