27 July 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

भाजपच्या १०० स्मार्ट सिटी शोधून सापडेना अन शहा दिल्लीत फुकट वायफाय'च्या शोधात

Chief Minister Arvind Kejriwal, Amit Shah

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.

२२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आधीच प्रचाराला सुरुवात केली असून स्वतः अमित शहा यांनी केजरीवाल साकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, २०१४ मध्ये देशभरात १०० स्मार्ट-सिटी उभ्या करण्याची घोषणा होऊन एकही स्मार्ट सिटी देशात उभी राहिलेली नाही. परंतु, सध्या तेच अमित शहा दिल्लीत फुकट वायफाय’ची रेंज शोधताना दिसत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

राजधानी दिल्लीत सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले होते. मात्र, हे कॅमेरे कुठे लावले आहेत, याचा शोध दिल्लीतील जनता घेत आहे. वायफाय शोधता-शोधता लोकांच्या फोनमधील बॅटरी संपून जाते. पण, वायफाय काही मिळत नाही, असे सांगत अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला.

 

Web Title:  Delhi Assembly election 2020 BJP President Amit Shah WIFI CCTV camera Chief Minister Arvind Kejriwal.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x