20 April 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

केंद्राने पाणी पुरवठा बंद केला | आत्मनिर्भर शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदायला घेतली

Delhi, protesting farmers, digging borewell, Sindhu border

नवी दिल्ली, ०३ फेब्रुवारी: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मात्र दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकरी आंदोलकांमध्ये कमालीचा रोष आहे. तरीही आंदोलन थांबणार या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. “आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर बोअरवेल खणून पाणी मिळवू पण आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. जोवर आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होत नाही तोवर आम्ही इथून माघारी जाणार नाही”, असं शेतकरी आंदोलक कुलजित सिंग म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारने वीज तोडली म्हणून शेतकऱ्यांनी तंबुवर सोलर पॅनल बसविण्यास सुरुवात केली होती. मात्र आता पाण्यावर देखील पर्यायी मार्ग शोधला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सीमेवर थेट बोअरवेल खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा निश्चय किती मोठा आहे याचा अंदाज येऊ शकतो.

 

News English Summary: Farmers had started installing solar panels on tents as the central government cut off power. But now an alternative has been found on water as well. For this, farmers have started digging borewells directly at the border. So one can guess how big the determination of the farmers is.

News English Title: Delhi protesting farmers digging borewell at sindhu border for water news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x