6 May 2025 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

माध्यमांच्या भडिमारानंतर फेसबुकने द्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या भाजपच्या पोस्ट हटवल्या

Facebook, T Raja Singh, Anand Hegde. hate posts, Wall Street Journal report

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट : द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते.

रिपोर्टमध्ये भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचं आवाहन करत आहेत. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, “अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीनं सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे.”

दरम्यान, फेसबुकने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे यांच्या काही पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकच्या निष्पक्षतेवर द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने भाजप नेत्यांच्या ‘हेट स्पीच’ असलेल्या पोस्टविरोधात कारवाई करण्यास फेसबुक जाणून बुजून कुचराई करत आहे असे जर्नलने म्हटले होते. एका मोठ्या योजनेच्या आड फेसबुक हा भाजप आणि कट्टरतावाद्यांबाबत पक्षपातीपणा करत आहे, असेही जर्नलने म्हटले होते.

भाजप नेत्यांच्या पोस्ट हटवल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर मोठा परिणाम होईल, असे फेसबुक इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास यांनी म्हटल्याचा दावा जर्नलच्या वृत्तात करण्यात आला आहे. फेसबुकसाठी यूजर्सच्या दृष्टीने भारत हा सर्वात मोठा बाजार आहे. या वृत्तात टी. राजा सिंह यांच्या एका पोस्टचा हवाला देण्यात आला होता. यात कथित रुपात अल्पसंख्याकांविरोधातील हिंसेचे समर्थन करण्यात आले होते. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, धोकादायक व्यक्ती आणि संस्थांबाबतच्या धोरणानुसार राजा यांना बॅन केले गेले पाहिजे, असे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी ठरवले होते.

 

News English Summary: Facebook has accused Bharatiya Janata Party leader T. Some posts of Raja Singh and Anand Hegde have been deleted. The company has taken this step after questioning Facebook’s impartiality in The Wall Street Journal.

News English Title: Facebook taken down T Raja Singh and Anand Hegde posts after Wall Street Journal report News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या