25 January 2025 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

इंग्रजी चॅनेलचा संपादक तुमचे रोज कपडे उतरवतो तरी सर्व नेते शेपट्या घालुन बसलेत - संदीप देशपांडे

MNS leader Sandeep Deshpande, Minister Eknath Shinde, MP Rajan Vichare, Avinash Jadhav

मुंबई, १६ ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्र सैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांदरम्यान खटके उडताना दिसत आहेत आणि त्यातून निरनिराळ्या राजकीय टिपण्या सुद्धा दोन्ही बाजूने होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील राजकरणात अस्तित्वात असले तरी तोंड न उघडणारे खासदार देखील सध्या प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या अविनाश जाधव यांनी, ‘ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांनाही एक दिवस अशाचप्रकारे घरातून उचलून नेऊ’ असं विधान केल्याने शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मनसेला थेट आव्हान दिलं आहे. आम्ही पदावर असलो तरी शिवसेनेत आमचं एक पद आहे ते शिवसैनिक….त्यामुळे आमच्या नादी लागू नका असं खासदार राजन विचारे म्हटले होते. त्यावर अविनाश जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

दुसरीकडे मनसेचे इतर पदाधिकारी देखील संतापले असून ते देखील अविनाश जाधव यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. मनसेचे आक्रमक पदाधिकारी म्हणून परिचित असलेले संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा”, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. अविनाश जाधव यांच वक्तव्य इतक झोबंल आहे की ठाण्यातले सगळे उंदीर बाहेर पडून चू चू करत आहेत. जेव्हा इंग्रजी चॅनेलचा संपादक तुमचे रोज कपडे उतरवतो तेव्हा एकाही नेत्याची बोलायची हिम्मत नाही शेपट्या घालुन बसलेत.

एवढं लक्षात ठेवावं चढता सुरज धीरे ढलता है ढल जायेगा, अशी टीका माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केली आहे. शिवसेनेचे नेते जे बोलत आहेत तो सत्तेचा माज आहे. हा माज उतरवायची ताकद महाराष्ट्र मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. अविनाश जाधव यांच्यासोबत सर्व मनसे कार्यकर्ते आहेत.

मनसे जिल्ह्याप्रमुख अविनाश जाधव यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या नंतर मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात आहे. व्हिडिओ बाइट देऊन एका रात्रीत कुणी नेता होत नाही, अशा शब्दांत खासदार राजन विचारे यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या औकातीत राहा, असा इशाराही त्यांनी दिला होता.

 

News English Summary: MNS Avinash Jadhav’s criticism of Thane District Guardian Minister Eknath Shinde has sparked a wave of anger. Other Shiv Sena leaders have responded to Avinash Jadhav. Meanwhile, MNS’s Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leaders.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande slams Shivsena minister Eknath Shinde and MP Rajan Vichare News Latest updates.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x