14 September 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News
x

त्यांनी न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? - शरद पवार

Former Chief Justice of India, Ranjan Gogoi, Judiciary, Sharad Pawar

नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी: माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेवर टीका केली आहे. जर कोणी भारतीय न्यायालयात गेला तर त्यांना निकालासाठी सतत प्रतीक्षा करावी लागेल. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं स्पष्ट मत रंजन गोगोई यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.

यावेळी रंजन गोगोई म्हणाले की, घटनात्मक संस्था म्हणून न्यायपालिका किती महत्त्वाची आहे, यावर जोर देण्याची गरज नाही. तुम्हाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था हवी आहे, परंतु इकडे तुमची न्यायव्यवस्था उध्वस्त झाली आहे.

उच्च न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांच्या आकडेवारीत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे आणि सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी 6,000-7,000 नवीन प्रकरणे दाखल केली आहेत. यावरून असे दिसून येते की, न्यायालयांमध्ये सुमारे 4 कोटी खटले प्रलंबित आहेत, उच्च न्यायालयांमध्ये 44 लाखांपेक्षा जास्त खटले आणि सर्वोच्च न्यायालयात सुमारे 70,000 खटले प्रलंबित आहेत.

दरम्यान, गोगोई यांनी केलेल्या विधानावर भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शंका उपस्थित केली आहे. त्यांनी या विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे.

राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश यांनी जे काल विधान केले आहे. ते अंत्यत धक्कादायक आहे. त्यांनी विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना?, हे मला ठाऊक नाही. तसेच त्यांनी केलेल विधान प्रत्येकासाठी चिंता निर्माण करणारं ठरणार आहे. या बद्दल माझ्या मनात शंका नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: NCP president Sharad Pawar has also raised doubts while commenting on Gogoi’s statement. Didn’t he try to tell the truth about the justice system through this statement? This question has been raised by Pawar.

News English Title: Former Chief Justice of India Ranjan Gogoi statement on Judiciary reaction from Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x