14 December 2024 7:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी

PM Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.

राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मोदी आणि शहा यांच्यावर ही टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देशातील तरुणांना संबोधित केले आहे. ‘प्रिय तरुणांनो मोदी आणि शहा यांनी तुमचं भविष्य नष्ट केलं आहे. नोकऱ्या मिळत नसल्याने तुमच्या मनात आल्या प्रचंड रोषाला ते समोरं जाऊ शकत नाहीत. त्यांनी देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी केली’, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्याबरोबर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. “कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यासह जे उपाय सरकारनं केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत. खरतर ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गेले. नोकऱ्या गेल्या. कमी उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. तळाला असणाऱ्या २५ ते ३५ कामगार वर्गाला मदत करण्याची वेळ आहे. पण, सरकारनं केवळ ८०० कंपन्यांना सरकारनं मदत केली,” असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं.

 

Web Title:  Former Congress President Rahul Gandhi Slammed PM Narendra Modi and Union Home Minister Amit Shah.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x