15 July 2020 11:53 PM
अँप डाउनलोड

चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करणार

PM Narendra Modi, Amit Shah, P chidambaram, CBI

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, विरोधी पक्षांकडूनही या अटकेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्यावर रात्रभर प्रश्नांची सरबत्ती केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

२०११ मध्ये चिदंबरम यांच्या खांद्यावर गृहमंत्रीपदाची धुरा होती. सीबीआयच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच यावेळी या कार्यक्रमात चिदंबरम यांच्याव्यतिरिक्त कपिल सिब्बल, विरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मंगळवारपासून सीबीआय आणि ईडी चिदंबरम यांचा शोध घेत होती. परंतु ते बेपत्ता झाले होते. बुधवारी रात्री 8 वाचता अचानक ते काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी आपली बाजू मांडली आणि आपल्या निवासस्थानी रवाना झाले.

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जमीन नाकारल्यानंतर गेल्या ७२ तासापासून ईडी आणि सीबीआय त्यांचा शोध घेत होती. अखेर काल रात्री पुढे येत चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आपल्यावरील सर्व आरोपांचे खंड केले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#P Chidambaram(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x