19 April 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

आसाम-मिझोराम वाद पेटला | मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा, IG, DIG यांच्यावरही FIR

Assam Mizoram Conflict

गुवाहाटी, ३१ जुलै | ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा वादात मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वसरमा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या व्यतिरिक्त, 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आसामच्या 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 अज्ञात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) जॉन नेहलिया यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, या सर्वांवर खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी षडयंत्रासह अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगटे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषा लागून असलेल्या कचर भागामध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. यामध्ये ५ मिझोराम पोलिसांचा मृत्यू झाला असून पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये. या प्रकरणात शुक्रवारी आसाम प्रशासनाने मिझोरामच्या संबंधित कोलासिब जिल्हा प्रशासनातील ६ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली.

IG, DIG यांच्यावरही FIR
नेहलिया म्हणाले की, ज्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यामध्ये आसामचे पोलीस IG अनुराग अग्रवाल, DIG देवज्योती मुखर्जी, कचरचे SP चंद्रकांत निंबाळकर आणि धोलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी साहब उद्दिन यांचा समावेश आहे. कछार उपायुक्त कीर्ती जल्ली आणि कछार विभागीय वन अधिकारी सनीदेव चौधरी यांच्यावरही याच आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: FIR filed against Assam CM Himanta Biswa Sarma In Conflict With Mizoram news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x