नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. CJI रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी सुरु होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाला सदर प्रकरणावर रोज सुनावणी हवी आहे, त्यामुळे निकाल लवकर लागू शकेल.
सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि याचिका कर्त्यांची मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान, न्यालयानेच या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेतलं होता. दुसरं म्हणजे सदर प्रकरणाला अनुसरून कोर्टाकडे अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते.
अलाहाबाद हायकोर्टाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने ३० सप्टेंबर २०१० मध्ये २.७७ एकर जमीन ३ पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. परंतु, या निर्णयाविरोधात १४ पेक्षा अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने ९ मे २०११ मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.
