25 April 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारे ट्वीट मोठ्याप्रमाणावर डिलीट

Sonu Sood, Social Media, Migrants

मुंबई, ८ जून: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

सोनू सूद हा लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी सोडण्याची सोय करतोय. त्याच्या या कार्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?’, असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आला. यावरून काल दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर अखेर रात्री पावणे दहाच्या सुमारास सोनू सूदने काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांच्यात चर्चा झाली.

दरम्यान, सोशल मीडियावर त्याला मदतीसाठी अनेक मेसेज येत होते. पण मदतीची मागणी करणारे हे ट्वीट अचानक डिलीट होऊ लागलेयत. त्यामुळे ट्वीटवरून मदत मागणारे हे नक्की गरजुचं होते ? की कोणी हे करवून घेत होतं ? असा प्रश्न निर्माण झालायं. सोनु सूदचे समाजकार्य, भाजप नेत्यांचा पाठींबा तसेच राज्यपालांची भेट या सर्वावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संशय देखील व्यक्त केला होता.

मी घरात अडकलोय, आमच्या कुटुंबाला गावी जायचंय असे अनेक ट्वीट सोनु सूदला आले. याला सोनुने देखील तात्काळ उत्तर दिले. मन हेलवणारे हे ट्वीट्स आणि त्याचे सोनुने दिलेले रिप्लाय होते. याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियात व्हायरल देखील होत होते. पण यातले बरेचसे ट्वीट आता डिलीट होऊ लागलेयत. यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकू लागलीय. अशा प्रकारच्या ट्वीट्समुळे सोनु सूद स्वत: देखील चिंतेत आहे.

 

News English Summary: Sonu Sood received many tweets saying that our family wants to go to the village. Gold also responded immediately. It was a heartwarming tweet and a golden reply. Screenshots of it were also going viral on social media. But many of these tweets are now being deleted.

News English Title: Help from Sonu Sood Screenshots of it were also going viral on social media But many of these tweets are now being deleted News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x