17 April 2021 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला - संजय राऊत

Sonu Sood, Shivsena

मुंबई, ८ जून: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सोनू सूद हा लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी सोडण्याची सोय करतोय. त्याच्या या कार्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते?’, असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आला. यावरून काल दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर अखेर रात्री पावणे दहाच्या सुमारास सोनू सूदने काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांच्यात चर्चा झाली.

तसेच सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधून टीका केल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरही संजय राऊत यांनी सोनू सूदला खोचक टोला लगावला आहे. ‘अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले,’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी सोनू सूद याने मराठीमध्ये ट्विट केलं. ‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,’ असं सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

 

News English Summary: After meeting Bollywood actor Sonu Sood’s ‘Matoshri’, Shiv Sena MP Sanjay Raut tweeted and slammed him. “Finally, Sonu Sood Mahasaya found the address of the Chief Minister of Maharashtra and reached Matoshri,” tweeted Sanjay Raut.

News English Title: After meeting Bollywood actor Sonu Sood Matoshri Shiv Sena MP Sanjay Raut tweeted News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1278)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x