22 September 2019 2:09 PM
अँप डाउनलोड

जंगलराज! यूपीत पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून व्हायरल

Yogi Adityanath

रामपूर : यूपीत कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र असून राज्यात योगी राज आहे की जंगलराज असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल योगी सरकारकडून अनेक दावे केले जातात पण राज्यात महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं चित्र अनेक घटनांवरून सिद्ध होत आहे. आता रामपूरमध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

दुचाकीवरुन जाणाऱ्या एका जोडप्याचा मार्ग काही आरोपींनी रोखून धरला. त्यानंतर आरोपींनी महिलेला खूप त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान पतीने त्यांना विरोध केल्यानंतर आरोपींनी दोघांना प्रचंड मारहाण केली. मात्र आरोपी एवढयावरच थांबले नाहीत. त्यांनी थेट महिलेच्या पतीला झाडाला बांधले आणि त्याच्यासमोर पत्नीवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर आरोपींनी या प्रकाराचा थेट व्हिडिओ बनवला आणि समाज माध्यमांवर व्हायरल केला. जोडप्याने आरोपींविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांनी जेव्हा हे प्रकरण उचलून धरले तेव्हा पोलिसांनी हालचाल सुरु केली. दरम्यान ३ आरोपींची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Yogi Government(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या