11 February 2025 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

फेसबुक इंस्टाग्रामसह ८९ ऍप डिलीट करण्याचे भारतीय लष्कराचे जवानांना आदेश

Indian Army, Facebook, Instagram

नवी दिल्ली, ९ जुलै : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं.

दरम्यान आता भारतीय लष्कराकडून ८९ ऍप्स बॅन करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आणि कर्मचाऱ्यांना ८९ ऍप्समधील सर्व ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. मेसेजिंग प्लॅटफॉर्म, वेब ब्राउझर, कंटेंट शेयरिंग, गेमिंग इत्यादीवरील सेवेवर सैन्याने बंदी घातली आहे. ज्यामध्ये फेसबुक, टिकटॉक, ट्रूकॉलर (Truecaller), इंस्टाग्राम (Instagram), यूसी ब्राउजर, PUBG इत्यादी ऍप्सचा समावेश आहे.

जवानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय या निर्णयाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. १५ जुलै पर्यंत ८९ ऍप्स आपल्या स्मार्ट फोनमधून काढून टाकण्याचे आदेश भारतीय लष्कराने जवानांना दिला आहे.

भारतील लष्कराकडून बॅन करण्यात आलेले ऍप;

  • मेसेजिंग प्लॅटफॉर्म – वी चॅट, क्यूक्यू, किक, आऊ वो, निम्बज, हेलो, क्यू जोन, शेयर चॅट, वायबर, लाइन, आयएमओ, स्नो, टो टॉक, हाइक.
  • व्हिडिओ होस्टिंग: टिक-टॉक, लाइकी, समोसा, क्वाली
  • कंटेंट शेयरिंग: शेयर इट, जेंडर, जाप्या
  • वेब ब्राउजर: यूसी ब्राउजर, यूसी ब्राउजर मिनी
  • व्हिडिओ आणि लाइव स्ट्रिमिंग : लाइव मी, बिगो लाइव, झूम, फास्ट फिल्म्स, वी मेट, अप लाइव, विगो व्हिडिओ
  • यूटिलिटी ऍप : कॅम स्कॅनर, ब्यूटी प्लस, ट्रू कॉलर
  • गेमिंग ऐप्स: पबजी, नोनो लाइव, क्लॅश ऑफ किंग्स, ऑल टेंसेंट गेमिंग एप्स, मोबाइल लीजेंड्स
  • ई कॉमर्स: अली एक्सप्रेस, कल्ब फॅक्ट्री, गियर बेस्ट, चायना ब्रांड्स, बँग गुड, मिनिन द बॉक्स, टायनी डील, डीएचएच गेट, लायटेन द बॉक्स, डिएक्स, एरिक डेस्क, जॉफुल, टिबीड्रेस, मोडिलिटी, रोजगल, शीन, रोमवी
  • डेटिंग ऐप: टिंडर, ट्रूअली मॅडली, हॅप्पन, आयल, कॉफी मीट्स बॅजल, वू, ओके क्यूपिड, हिंग, एझार, बम्बली, टॅनटॅन, एलीट सिंगल्स, टॅजेड, काउच सर्फिंग
  • एंटी व्हायरस: 360 सिक्योरिटी
  • NW: फेसबुक, Baidu, इंस्टाग्राम, एलो, स्नॅपचॅट
  • न्यूज ऍप्स : न्यूज डॉग, डेली हंट
  • ऑनलाइन बुक रीडिंग: प्रतिलिपि, वोकल
  • हेल्थ ऍप: हील ऑफ वाई
  • लाइफस्टाइल ऍप : पॉपएक्सो
  • नॉलेज ऐप: वोकल
  • म्यूझिक ऐप्स: हंगामा
  • ब्लॉगिंग/मायक्रो ब्लॉगिंग: येल्प, तुम्बिर, रेडिट, फ्रेंड्स फीड, प्रायव्हेट ब्लॉग्स

 

News English Summary: The Indian Army has ordered its personnel and staff to delete all apps in 89 apps. Services on messaging platforms, web browsers, content sharing, gaming, etc. have been banned by the military. These include apps like Facebook, TickTalk, Truecaller, Instagram, UC Browser, PUBG etc.

News English Title: Indian Army asks its personnel to delete 89 apps including Facebook Instagram News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x