12 December 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी दोन तारखांचे पर्याय, पंतप्रधान कार्यालय घेणार निर्णय

Ayodhya Ram Mandir, trust meeting, foundation stone

अयोध्या, १८ जुलै : अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक संपली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीमध्ये शिलान्यासाच्या तारखेबरोबरच मंदिराची उंची आणि मंदिर बांधकामाच्या व्यवस्थांवरही चर्चा झाली. राम मंदिर उभारण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे भूमिपूजनानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरूवात होईल.

मिळालेल्या माहितीनुसार ३ ऑगस्ट किंवा ५ ऑगस्ट भूमिपूजनाची संभाव्य तारीख असू शकते. पण याबाबत पंतप्रधान कार्यालय अंतिम निर्णय घेईल. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याचीही शक्यता आहे. असं झालं तर २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच अयोध्येत जातील.

आजच्या बैठकीत मंदिराचा आराखडा बदलण्याचाही निर्णय घेण्यात आला. या मंदिराला आता तीन ऐवजी पाच घुमट असतील. याशिवाय आता मंदिराची उंचीदेखील प्रस्तावित डिझाईनपेक्षा अधिक असेल. बैठकीनंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, सर्व परिस्थिती व्यवस्थित झाल्यानंतर फंड एकत्र केला जाईल. आम्हाला वाटते, की 3-3.5 वर्षांच्या आत मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होईल.

बैठकीला मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रादेखील उपस्थित होते. नृपेंद्र मिश्रा यांच्यासह अभियंत्यांचा एक चमूही अयोध्येत आहे. हा चमू मंदिर निर्माणाच्या बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवेल. राम मंदिराचे मॉडेल तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा यांच्याशिवाय त्यांचा मुलगा निखिल सोमपुरा, हेदेखील अयोध्येत पोहोचले आहेत.

 

News English Summary: An important meeting of Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra Trust has come to an end for the construction of Ram Mandir in Ayodhya. According to sources, the meeting also discussed the date of the foundation stone, the height of the temple and the arrangements for the construction of the temple.

News English Title: Ayodhya Ram Mandir trust meeting about discussion of foundation stone date News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x