2 May 2025 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

झारखंड सोरेन सरकारमधील आमदार खरेदी कटात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव | आरोपीचा कबुलीजबाब

Jharkhand congress MLA deal

रांची, २६ जुलै | झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं एक कारवाई करत तीन जणांना अटक केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तिघांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विशेष म्हणजे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. या खरेदीसाठी विदर्भातील भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि जयकुमार बेलखेडे या भाजप नेत्यांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी अभिषेक दुबे याने दिलेल्या कबुलीजबाबात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नावे घेतली आहेत.

काँग्रेसचे दोन आमदार उमाशंकर अकेला, इरफान अन्सारी आणि अपक्ष आमदार अमितकुमार यादव यांच्यासह १५ जुलै रोजी दिल्लीला गेलो होतो. तेथे महाराष्ट्रातील भाजपच्या दोन नेत्यांशी आमदारांचा व्यवहार ठरला होता. एक कोटी रुपये अॅडव्हान्स मिळणार होते. पण अॅडव्हान्स न मिळाल्याने आमदार रांचीला परतले. दिल्लीला जाण्यासाठी या सर्वांची तिकिटे महाराष्ट्रातील एक व्यावसायिक जयकुमार बेलखेडे यांनी काढली होती. दिल्लीत व्दारका येथील विवांता या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. त्यानंतर बावनकुळे, चरणसिंग यांच्यासह काही नेत्यांच्या घरी गेलो, असा दावा अभिषेक दुबे याने केला आहे. दुबे याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती.

१६ जुलैला अनेक नेत्यांना भेटले तिन्ही आमदार:
१६ जुलैला सकाळी १० वाजता तिन्ही आमदारांना घेऊन बेलखेडे, बावनकुळे आणि चरणसिंह यांनी अनेक नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली. तेथे आमदारांना एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याबाबत चर्चा झाली. पण आमदारांना रक्कम अॅडव्हान्समध्ये मिळाली नाही. त्यामुळे ते सर्वजण नाराज झाले आणि त्याच दिवशी ३.५५ वाजेच्या विमानाने रांचीला परतले. रांचीला आल्यानंतर सर्वजण आपापल्या मतदारसंघांत निघून गेले. आमदार परत गेल्यानंतरही बेलखेडे त्यांच्या संपर्कात होते.

२१ जुलैला बेलखेडे इतर तिघांसोबत गेले रांचीला:
२१ जुलैला जयकुमार बेलखेडे यांच्यासह चार जण दुपारी २.३० च्या विमानाने मुंबईहून रांचीला गेले. हॉटेल ली लॅकमध्ये ४०७, ३०७, ३१० आणि ६११ या क्रमांकाच्या खोल्या बुक केल्या. रांचीत त्यांनी अनेक आमदारांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये आल्यानंतर बेलखेडे यांनी अभिषेक दुबेला फोन करून बोलावले. दुबेने सांगितले की, बोकारो येथील अमितकुमार व संतोषकुमार दोन आमदारांशी व्यवहार ठरवत होते.

ऐकू येत नसल्याचे सांगून फोन कट बावनकुळे यांनी फोन कट केला:
यासंदर्भात प्रसार माध्यमांनी १५ -१६ जुलै रोजी आपण कुठे होता, असे विचारले असता त्यांनी ऐकू येत नसल्याचे सांगून फोन कट केला. झारखंडमध्ये दाखल एफआयआरमध्ये जयकुमार बेलखेडे यांचेही नाव नमूद केले असून ९२८४८६६३११ हा भ्रमणध्वनी दिलेला आहे. त्यावर संपर्क साधला असता तो स्विचआॅफ होता. भाजप नेेते चरणसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काटोलमधलेच काम सांभाळत नाही, तिथे झारखंडमध्ये जाण्याची फुरसत आहे कुठे ?

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Jharkhand congress MLA deal case BJP leader Chandrasekhar Bavankule is highlighted news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या