कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या ६व्या टप्प्यासाठी आज पश्चिम बंगालमधील ८ जागांवर मतदान सुरू आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्यापूर्वीच हिंसाचाराची घटना घडली आहे. आज मतदानापूर्वी प. बंगालमध्ये एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा तर एका टीएमसी कार्यकर्त्याचा मृतदेह आढळूनने खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात. याठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये नेहमी वाद होत असतो. मतदानापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे मृतदेह सापडले आहे. रामेन सिंह असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव असून त्याची हत्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप स्थानिक भारतीय जनता पक्षाने केला आहे. तर दुसरीकडे तृणमूलच्या २ कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

लोकसभा मतदान: प. बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या