20 April 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218

India corona pandemic

गांधीनगर, १४ मे | महिन्याभरापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली होती. या याचिकेवर (१२ एप्रिल) सुनावणी पार पडली होती.

यावेळी कोर्टाने विविध मुद्दे उपस्थित करत सरकारकडे उत्तरं मागितली होती. विशेष म्हणजे गुजरातच्या इस्पितळांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या असून त्यांना जागाच उपलब्ध होतं नाही. यावरून न्यायालयाने ‘गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत’ अशी धक्कादायक टिपणी केल्याने गुजरात सरकारची चांगलीच पोलखोल झाल्याचं म्हटलं गेलं होतं.

आता सुद्धा गुजरातमधून धक्कादायक माहिती समोर येणं सुरूच आहे. गुजरातमध्ये कोरोनाने भयंकर रूप घेतलं असून राज्यातील अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या प्रमुख शहरांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी मोठ्या मोठ्या रांगा लागल्या असून तेथे वेटिंग लिस्ट देखील मोठी आहे.

दुसरीकडे, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असताना संबंधित सरकारी खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने अनेक प्रश्न निर्माण केलं आहेत. एका रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये मागील 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यू दाखले वितरित करण्यात आले आहेत. परंतु, कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मृत्यू होऊनही केवळ 4 हजार रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचं सांगणं वास्तवाला विसंगत असल्याचं म्हटलं जातंय.

गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेले मृत्यू आणि जारी करण्यात आलेले डेथ सर्टिफिकेटचे आकडे यांच्याशी तुलना करता, जे ताजे आकडे समोर आले आहेत ते दुप्पट आहेत. गुजरातमधील वृत्तपत्र दिव्य भास्करने 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या मृत्यू दाखल्यांवरुन एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे.

पाच महानगरांमध्यील मृत्यू दाखल्यांची आकडेवारी:

शहर             कोरोनाने मृत्यू       मृत्यू दाखले

अहमदाबाद         2126                 13593
सूरत                    1074                 8851
राजकोट               288                 10887
वडोदरा                 189                 7722
भावनगर                134                4158

 

News English Summary: Shocking information continues to emerge from Gujarat. In Gujarat, corona is rampant and Ahmedabad, Surat, Rajkot, Bhavnagar and Jamnagar districts have the highest number of corona patients. There are long queues for funerals in the cemeteries of these major cities and there is also a long waiting list.

News English Title: Lots of difference between corona death and issued numbers of death certificates in Gujarat state news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x