1 May 2025 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

बेटी बचाओ बेटी पढाओ हे ढोंग! भाजप आमदाराचा नातू तलवार घेऊन तरुणीच्या घरी

BJP, Narendra Modi, Amit Shah

गुना : भाजपने देशात सत्तेत आल्यावर बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणा देत मोठी जाहिरातबाजी केली. परंतु त्यांचा खरा चेहरा याआधी देखील समोर आला असताना आता अजून एका प्रकरणाची भर पडली आहे. मध्य प्रदेशातील गुना मतदासंघाचे आमदार गोपीलाल जाटव यांचा नातवावर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. एका मुलीला तिच्या कुटुंबियांना आमदार गोपीलाल जाटव यांचा नातू विवेक जाटव मागील दीड वर्षांपासून धमकावत असून, प्रचंड त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली आहे.

त्यात रोज फोनकरून जबरदस्तीने गप्पा मारण्यास सांगतो. तसेच मी इथला राजा असून तू माझं काहीच करू शकत नाही अशी धमकी त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना मागील अनेक महिने देत आहे. अखेर मागील अनेक वर्ष दहशदीखाली असलेल्या मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसापासून तो तरुणीच्या घरी रोज तलवार घेऊन येतो आणि तिच्या कुटुंबाला धमकावत मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकण्याची खुलेआम धमकी देत आहे. पोलिसांनी तक्रार करून यात काहीच हालचाल न केल्याने सदर कुटुंब अजूनच धास्तावलं आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात देखील ती घटना रेकॉर्ड झाली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या