2 May 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

असे सलवार कुर्ता घालून पळताना महिला अधिकारी आवश्यक आहेत, निदान कोणाचीतरी आई त्यांना अटक करेल

Ramdev Baba

मुंबई, २८ मे | कोरोना काळात योग गुरू रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे. योगगुरु रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधानं न करण्याचा सल्ला दिला आहे.

रामदेव बाबा यांच्यावर साथरोग कायदा, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रामदेवबाबांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून देखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बाबा रामदेव यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना म्हटलं आहे की, “कोणाचा बाप मला अटक करू शकत नाही” हे बाबा रामदेव यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. ते असे सलवार कुर्ता घालून पळत असताना पुरुष अधिकारी त्यांना अटक करू शकणार नाही, त्यासाठी महिला अधिकारी आवश्यक आहे. म्हणून कोणाचा बाप नाही पण कोणाचीतरी आई रामदेव बाबांना नक्की अटक करेल”.

 

News English Summary: Baba Ramdev’s statement that no one’s father can arrest me is correct. A male officer cannot arrest him while he is running away wearing a salwar kurta, he needs a female officer. So no one’s father but someone’s mother will definitely arrest Baba Ramdev said NCP leader Rupali Chakankar.

News English Title: NCP leader Rupali Chakankar criticized Baba Ramdev over his statement on arrest news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamdevBaba(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या