4 May 2025 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER
x

आता बोलून टाका! उरी, पुलवामा व गडचिरोलीतील घटनेला पण नेहरू जबाबदार: नेटिझन्स

Pandit Neharu, Narendra Modi, Loksabhe Election 2019

कौशंबी : उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला उजाळा देत त्याचे खापर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले.

दरम्यान, येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा कुंभमेळ्यात आले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत केवळ काँग्रेसचीच सत्ता होती. इतर पक्ष अस्तित्वातही नव्हते. त्यावेळच्या अनागोंदी कारभारामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन हजारो लोक मारले गेले होते. मात्र सरकारची प्रतिमा जपण्यासाठी चेंगराचेंगरीच्या बातम्या दाबल्या गेल्या. ही घटना घडली त्याचे वार्ताकन करण्याची हिंमत त्यावेळच्या प्रसारमाध्यमांनीही केली नाही, तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावेही जाहीर केली गेली नाहीत की, त्यांना एक रुपयांची भरपाई मिळाली नाही. नेहरूंच्या असंवेदनशीलतेचा हा एक दाखलाच आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मोदी प्रचारात मूळ मुद्दे सोडून प्रत्येक विषयात नेहरू आणि गांधी घराण्याला ओढत असल्याने आता नेटकरी देखील संतापल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील कोणत्याही नकारात्मक गोष्टीला केवळ नेहरूच जवाबदार असतात, त्यामुळे देशात घडलेल्या उरी, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यामागे देखील नेहरूंचा हात असून तेच या गंभीर घटना जवाबदार असल्याची उपहासात्मक टीका सध्या समाज माध्यमांवरील नेटकरी करताना दिसत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या