1 May 2025 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT
x

एनआयए'ची दिल्ली आणि यूपीत छापेमारी, नियोजित दहशदवादी कारवाया उघड

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने सुरक्षे संदर्भातील मोठी माहिती सार्वजनिक केली आहे. युपी आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. एनआयए’च्या ताब्यात असलेले दहशदवाद्यांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या योजना उघड झाल्या होत्या. देशात विविध ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची दहशदवाद्यांची योजना होती. देशातील विविध पक्षातील नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या केंद्रस्थानी होत्या अशी माहिती देण्यात आली.

दिल्ली आणि यूपीत आज देिवसभर तब्बल १७ ठिकाणी मोठी छापेमारी करून एकूण १६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १०० मोबाईल, १३५ सिम कार्ड आणि सात लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले सर्व आरोपी २० ते ३० वयोगटातील असून मुफ्ती सोहेल हा या ग्रुपचा प्रमुख असल्याचं एनआयएने पत्रकार परिषदेत सांगितले. या सर्व अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी बॉंब बनवण्याची प्रक्रिया देखील आत्मसात केली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या