महत्वाच्या बातम्या
-
अयोध्या प्रकरणावर आज सुनावणी नाही, केवळ तारीख निश्चित करणार: CJI रंजन गोगोई
बहुचर्चित अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या विवादावर आज सुप्रीम कोर्टात कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आणि तशी माहिती प्रसार माध्यमांकडे पोहोचविण्यात आली आहे. सदर प्रकरणात आज केवळ पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे CJI रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वकाही RSSच्या अजेंड्याप्रमाणे, आर्थिक आरक्षण देऊन हळूहळू इतर आरक्षण रद्द केली जातील
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे घटनादुरुस्ती करणारे विधेयक आज वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले. काल हीच प्रक्रिया लोकसभेत पार पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा मोदी सरकारकडे डेटाच नाही, निर्णय निवडणुकीसाठी घाईगर्दीत?
उच्च जातींमधील आर्थिक दुर्बलांना कायदेशीर १० टक्के आरक्षण देण्यासाठी १२४ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर काल राज्यसभेत उशिरापर्यंत दीर्घ चर्चा सुरू होती. दरम्यान, बहुतेक विरोधी पक्षांनी घाईमध्ये उपस्थित केलेल्या विधेयकाबाबत मोदी सरकारवर सडकून टीका केली, परंतु त्यासोबत विधेयकाचे समर्थन सुद्धा केल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
'मोदीजी, भारताच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो': राहुल गांधींचा बोचरा प्रश्न
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप करताना काँग्रेसवाले महिलांचा अपमान करतात अशी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींना प्रश्न विचारून त्यांना चांगलच कोंडीत पकडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील आघाडीसाठी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आघाडी करण्यावरून बोलणी अंतिम टप्यात आहेत. एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवरील वाटप निश्चित झाले आहे. दरम्यान उर्वरित ८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्याअनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
6 वर्षांपूर्वी -
नरसय्या आडम पलटले; मी २०२२ मध्ये केवळ पंतप्रधान असं म्हणालो, पंतप्रधान मोदी असं नाही म्हणालो
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी व्यासपीठावरून भाषणादरम्यान माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी मोदींची तोंडभरून स्थुती केली. परंतु, कार्यक्रम आटोपून मोदींनी सोलापूरच्या हद्दीबाहेर जाताच त्यांनी आपल्या भाषणातील त्या वाक्याचा पूर्ण खुलासा केला आणि पुढचे पंतप्रधान मोदी नव्हे असे सूचक संकेत दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आर्थिक दुर्बलांना आरक्षणासाठी विधेयक राज्यसभेत सादर
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांना शिक्षण तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे घटनादुरुस्ती करणारे विधेयक आज वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आले. केंद्रीय समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले. काल हीच प्रक्रिया लोकसभेत पार पडली होती.
6 वर्षांपूर्वी -
सोलापूरला निवडणूकपूर्व स्मार्ट गाजर? लोकार्पणाच्या नावाने पुन्हा मोदी-मोदी-मोदी इव्हेंट?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते सोलापुरातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी सोलापुरात भाजपने एखाद्या पूर्वनियोजित इव्हेंटप्रमाणे तयारी केल्याचे निदर्शनास येत होतं. तसेच, सोलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या मोठ्या स्वागतासाठी पोस्टर्स आणि होर्डिंग्सचा सुळसुळाट करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#MeToo स्टंट? आलोकनाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्यात आलं असावं: न्यायालय
विनता नंदा यांनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी बॉलीवूड अभिनेते आलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याची शक्यता नाकारत येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्यक्त केले. दिग्दर्शक आणि निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथांवर काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत बलात्काराचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध FIR सुद्धा दाखल केला होता.
6 वर्षांपूर्वी -
सरकारी नोकऱ्यांच आमिष व 'आरक्षणाच्या' मोहजालात तरुण भीषण बेरोजगारीकडे जातो आहे? सविस्तर
सध्या आर्थिक स्थितीवर आधारित आरक्षणामुळे निर्णयामुळे संपूर्ण वर्गाला प्रचंड फायदा की भाजपच्या मतांच्या टक्केवारीला याचा विचार तरुणांनी करणे गरजेचे आहे. कारण दुसरी बाजू अशी आहे, कि ज्या आरक्षणाची भाजप बोंबाबोंब करत आहेत, त्यामुळे कोणाला किती सरकारी नोकऱ्या मिळणार याची त्यांना सुद्धा माहिती नाही. देशात ९५ टक्के नोकऱ्या या खासगीं क्षेत्रात आहेत आणि सरकारने तर जागोजागी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती सुरु केल्या आहेत, म्हणजे शेवटी ते सुद्धा खासगी नोकरी प्रमाणेच आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीच्या खेळीत, मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेबांशी तुलना? सविस्तर
काही दिवसांपूर्वी ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान योगी आदित्यनाथांनी मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. काल म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणि आरक्षणाच्या अनुषंगाने पुन्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ‘आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देणाऱ्या मोदींची २१ व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण द्यायला साडेचार वर्षे का लागली? खासदार आनंद अडसुळ
देशातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारला साडेचार वर्षे का लागली? असा प्रश्न शिवसेना खासदार आनंद अडसुळ यांनी उपस्थित करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात धनगड आणि धनगर असा शब्द बदलला तरी सुद्धा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही असं सुद्धा त्यांनी लोकसभेत विचारलं.
6 वर्षांपूर्वी -
आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्याचे यापूर्वी प्रयत्न झालेच नाहीत : जेटली
देशातील ५० टक्के राज्यांची सुद्धा मंजुरी आर्थिक मागास आरक्षणासाठी हवी अशी मागणी होती. परंतु, संबंधित कायद्यासाठी राज्यांच्या मंजुरीची कोणतीही आवश्यकता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आज लोकसभेत आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा सुरु होती, तेव्हाच अरुण जेटलींनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, पूर्वीच्या सरकारने गरीब सवर्णांना आरक्षण देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत हे सुद्धा त्यांनी बोलताना अधोरेखित केलं.
6 वर्षांपूर्वी -
ऑगस्टा गौप्यस्फोट: हॅश्केची कबुली, 'गांधी घराण्याचे नाव घेण्यासाठीच आमच्यावर दबाव'
बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलॅण्ड या हेलिकॉप्टर बनविणार्या कंपनीचा दलाल गुईडो हॅश्के याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टर खरेदी-विक्री व्यवहारात भारतातील गांधी घराण्याला लाच मिळाली हे सांगण्यासाठीच माझ्यावर मोठा दबाव आला असा धक्कादायक गौप्यस्फोट त्याने केला आहे. इटलीच्या कोर्टात ‘गांधी घराणे’ आणि ‘अहमद पटेल’ यांचे नाव घ्यावे यासाठी सरकारी वकिलाने मोठ्या चलाखीने माझ्या तोंडून त्यांची नावे वदवून घेण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न केला. परंतु मी त्यांची ती चलाखी ओळखली आणि कुणाचेही नाव घेतले नाही, असे हॅश्के याने एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राफेल घोटाळ्यात मोदींना कोणीही वाचवू शकत नाही: राहुल गांधी
लढाऊ विमान राफेल घोटाळयात मोदींना कोणी सुद्धा वाचवू शकत नाही. पंतप्रधानांनी रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना केवळ व्यक्तीगत फायदा मिळावा म्हणून हा घोटाळा केला आहे. दरम्यान, या आरोपांचा काँग्रेस अध्यक्षांनी पुनरुच्चार केला आहे. तसेच विद्यमान CBI संचालक आलोक वर्मांना राफेल लढाऊ विमानांच्या कराराची चौकशी करायची होती. म्हणून मोदी सरकारने त्यांना अचानक मध्यरात्रीपदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवर धाडले असे सुद्धा ते म्हणाले. त्यामुळेच मोदी लोकसभेत चर्चेपासून पळ काढाला, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
अभ्यासपूर्वक राफेल प्रकरणाचे सत्य लोकांसमोर आणणार: अण्णा हजारे
मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आधीच विरोधकांनी केला आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयावरून भाजपला काय करू आणि काय नको अशी परिस्थिती करून ठेवली आहे. परंत्तू, आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा सदर विषयात हात घालणार असल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अण्णा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राफेल प्रकरणाचा मी अभ्यास करत असून, याबाबतचे सत्य मी सामान्य जनतेसमोर आणेण अशी घोषणा, अण्णा हजारे यांनी यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन'चं वास्तव; केवळ २०१८ मध्ये १ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या: CMIE अहवाल
प्रति वर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याची आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारी नामांकित संस्था CMIE (सीएमआयई) नं मोदी सरकारच्या कार्यकाळातील बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव अभ्यासपूर्वक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे मागील २७ महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक असल्याची आकडेवारी सार्वजनिक झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
CBI प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला झापले, आलोक वर्मांना रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अर्थात सीबीआय वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकाला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने निकाल देताना सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा मोदी सरकारकडून तडकाफडकी घेण्यात आलेला आदेश रद्द केला आहे. त्यामुळे मोदी सरकार तोंडघशी पडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
देश निर्माण? मंदिर कार्यक्रमात भाजप नेत्याकडून खाद्यपदार्थांसोबत दारु वाटप, लहान मुलांना सुद्धा
भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलाने मंदिरामध्ये कार्यक्रमादरम्यान खाद्यपदार्थांच्या पाकिटातून मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक वृत्त हाती आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन याने सोमवारी पासी समाजासाठी श्रावण देवी या मंदिरामध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
6 वर्षांपूर्वी -
गुजरात: भाजपच्या माजी आमदाराची गोळ्या झाडून हत्या
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तसेच गुजरात भाजपचे माजी उपाध्यक्ष जयंतीलाल भानुशाली यांची काही अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाची नगरी एक्स्प्रेसमध्ये घडल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS