3 May 2025 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

१ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा | पण तत्पूर्वी शेतकरी दुसरा मोठा निर्णय घेणार?

Parliament March, May cancelled, Farmers unions

नवी दिल्ली, २७ जानेवारी: राजधानी दिल्लीत काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताकदिनी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. शेतकरी कालच्या प्रकारावर न थांबता देशाच्या अर्थसंकल्पादिवशी पुन्हा एल्गार करणार आहेत. शेतकऱ्यांचा १ फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारमध्ये ३०० पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. क्राईम ब्रँचकडे हिंसाचाराचा तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा केली होती. पण सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून ‘संसद मार्च’ रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याच दिवशी संसदेपर्यंत मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली होती. पण प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर संसद मार्च रद्द करण्याबाबतचा मोठा निर्णय शेतकरी संघटना घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

News English Summary: A press conference is likely to be held by the Delhi Police. The Crime Branch is likely to be tasked with investigating the violence. Meanwhile, farmers’ unions had announced that they would lay siege to the Parliament House on February 1. But in the wake of the current tensions, the ‘Parliament March’ is likely to be cancelled by farmers’ unions.

News English Title: Parliament March is likely to be cancelled by farmers unions news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या