25 April 2024 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी, समर्थकांची मंत्रिपदंदेखील काढली

Rajasthan Political Crisis, Sachin Pilot, Deputy Chief Minister, congress

जयपूर, १४ जुलै : राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय नाट्याने नवीन वळण घेतले आहे. अशोक गहलोत यांनी बहुमतासाठी 105 आमदाराचा पाठिंबा असल्याचं सिद्ध केल्यानंतर सरकार स्थिर राहणार असे स्पष्ट झाले होते. पण, त्यानंतर सचिन पायलट आणि त्यांनी समर्थकांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा करून मनधरणीचा प्रयत्न केला. पण, पायलट यांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. पायलट यांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास स्पष्ट नकार दिली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, पण गहलोत यांना मुख्यमंत्रिपदी ठेवू नका, अशी मागणीच पायलट यांनी केली आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

 

News English Summary: Sachin Pilot, who challenged Chief Minister Ashok Gehlot to prove his majority, has been sacked from the post of Deputy Chief Minister. In addition, three of his supporters have been removed from the ministry.

News English Title: Rajasthan Political Crisis Sachin Pilot removed as Deputy Chief Minister congress takes action News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x