2 May 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPS लॉबीचा मुद्दा कुचकामी ठरल्याने 'त्या' भेटीबाबत माध्यमातून पुड्या? | राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण

Rumours, Sharad Pawar, Amit Shah, Ahmadabad

मुंबई, २८ मार्च: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची वृत्त त्यानंतर वेगाने पसरली आहे.

दरम्यान, जर शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली असेल तर राज्यात असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. मात्र दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि इतर IPS अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी केलेल्या राजकारणामुळे कोणताही फायदा न झाल्याने आणि राऊत एकावर एक महाविकास आघाडीतील नेत्यांवर प्रतिउत्तर देणारी विधानं करू लागल्याने माध्यमांना हाताशी धरून हा प्रकार केल्याचं देखील म्हटलं जातंय. महाविकास आघाडीत संभ्रम वाढावा हाच त्यामागील उद्देश दिसतोय.

मात्र शरद पवार आणिअमित शहांच्या भेटीच्या वृत्ताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खंडन करण्यात आले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

 

News English Summary: The Gujarati newspaper ‘Divya Bhaskar’ has reported that NCP president Sharad Pawar and Praful Patel had secret talks with Amit Shah. Praful Patel and Pawar had come by private jet. The trio then met at a guesthouse in Shantigram, the report claimed. Consequences of this visit The news of the effect of this visit on the politics of Maharashtra has spread rapidly since then.

News English Title: Rumours on Sharad Pawar and Amit Shah meet at Ahmadabad news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या