13 May 2025 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL CDSL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: CDSL Alok Industries Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, हा पेनी स्टॉक देईल मजबूत परतावा - NSE: ALOKINDS
x

रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस | भारतीय कंपनी बरोबर करार

Russian vaccine, Dr Reddy labs, Sputnik V shot in India, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर : रशियात झालेली कोरोनावरील लस स्पुटनिक-व्ही लवकरच भारताला मिळणार आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीचे १० कोटी डोस विकण्याची तयारी रशियन सोव्हेरजियन वेल्थ फंडनं दर्शवली आहे. स्पुटनिक-व्ही लस परदेशी पाठवण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडनं (आरडीआयएफ) भारतीय कंपन्यांसोबत कोरोनावरील लसीचे ३० कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे. या ३० कोटी डोसची निर्मिती भारतात केली जाईल. भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेली डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक-व्ही लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या भारतात घेणार असल्याची माहिती आरडीआयएफनं दिली आहे.

लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे RDIF ने सांगितले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रक्रिया लगेच सुरु होईल असे आरडीआयएफकडून सांगण्यात आले आहे.

रशियाच्या या लशीवर जगभरातून बरीच टीका झाली होती. कारण तिसऱ्या फेज आधीच या लशीला मान्यता देण्यात आली होती. १०० पेक्षा कमी जणांवर लशीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करुन देण्यात आली. पुरेशा चाचणीअभावी ही लस हानीकारक ठरु शकते असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते.

काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते. लशीचा डोस दिल्यानंतर ठराविक दिवसांनी अँटीबॉडीज शरीरात तयार झाल्या असे अहवालात म्हटले होते. चाचणीमध्ये यशस्वी ठरल्यास पुढच्यावर्षीपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. भारतात सध्या कोव्हॅक्सीन, ऑक्सफर्ड आणि झायडसने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.

 

इतर महत्वाच्या बातम्या:

एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती

इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती

Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात

Health First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील

Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा

दिशाच्या लिव्ह इन पार्टनरचा जबाब महत्त्वाचा | नितेश राणेंच अमित शहांना पत्र

अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही | RBI गव्हर्नर

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती अधिक चिघळेल | संभाजीराजेंचा इशारा

ग्रामपंचायत निवडणुकीत पण निवडून येणार नाही | माध्यमं जास्तंच महत्व देत आहेत

 

News English Summary: Russia’s sovereign wealth fund has agreed to supply 100 million doses of its coronavirus vaccine, Sputnik-V, to Indian drug company Dr Reddy’s Laboratories, the fund said on Wednesday, as Moscow speeds up plans to distribute its shot abroad.
The deal comes after the Russian Direct Investment Fund (RDIF) reached agreements with Indian manufacturers to produce 300 million doses of the vaccine in India, which is a major consumer of Russian oil and arms.

News English Title: Russian vaccine maker ties up with Dr Reddy labs for supply of hundred million doses of Sputnik V shot in India Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या