23 September 2021 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

गंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह अंत्यसंस्कारही न करता दफन केले गेले | ते जगाने पाहिले - संजय राऊत

MP Sanjay Raut

नवी दिल्ली, २० जुलै | आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशातील गंगेच्या किनाऱ्यावर हजारो मृतदेह दफन केले गेले. हे जगाने पाहिलं. त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही झाले नाहीत. या मृतदेहांची विटंबना झाली, कायदो सांगतो मृतदेहांचा अपमान हे सुद्धा बेकायदा आहे. आम्ही परत एकदा मृतदेहांना मारलं, चिरडलं, अपमानित केलं. परंतु, माझा सरकारला सवाल आहे, तुम्ही मृतांचे आकडे का लपवता? सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष आकडे काही वेगळेच आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे मान्य, पण महाराष्ट्र सरकारच्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. महाराष्ट्र मॉडेल देशात राबवा असं सुप्रीम कोर्ट म्हणालं, तुम्ही राबवणार का? मुंबई मॉडेलचं कौतुक मद्रास कोर्टाने केलं. कोव्हिड सेंटर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कोर्टाने काय म्हटलंय ते तुम्ही वाचा, महाराष्ट्र -महाराष्ट्र काय करता, तुम्ही महाराष्ट्र येऊन बघा, सरकार कसं काम करतंय, असं संजय राऊत म्हणाले.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांचं उत्तर:
संजय राऊत यांनी आकडे लपवल्याचा आरोप केल्यानंतर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सरकारकडून उत्तर दिलं. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आपआपली आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सोपवत असते. त्यामुळे केंद्राने आकडे लपवण्याचा प्रश्न नाही. राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशांनीही आकडे लपवल्याचा रिपोर्ट नाही. काही राज्यांनी आकडे सुधारित केले आहेत, असं आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MP Sanjay Raut question over Ganga Ghat dead bodies during corona pandemic in Uttar Pradesh news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(246)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x