RBI'ने भाजपच्या मित्रांची नावं चोरांच्या लिस्ट'मध्ये टाकली आहेत - राहुल गांधी

नवी दिल्ली, २८ एप्रिल: काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. देशात बँकेचे कोट्यवधी रुपये बुडविणाऱ्या थकबाकीदारांची नावे केंद्र सरकार लपवत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नीरव मोदी, मेहुल चोकसीसह भारतीय जनता पक्षाच्या मित्रांची नावे ‘बँकेच्या चोरांच्या’ यादीत समाविष्ट केली आहेत असे संसदेत विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले.
मोदी सरकारने नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्यांसह एकूण ५० थकबाकीदारांचे सुमारे ६८,६०७ कोटी रुपये माफ केले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. या बरोबरच केंद्रातील मोदी सरकारने ६.६६ लाख कोटी रुपयांचे कर्ज सन २०१४ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान माफ केले असाही आरोप काँग्रेसने केला आहे.
संसद में मैंने एक सीधा सा प्रश्न पूछा था- मुझे देश के 50 सबसे बड़े बैंक चोरों के नाम बताइए।
वित्तमंत्री ने जवाब देने से मना कर दिया।
अब RBI ने नीरव मोदी, मेहुल चोकसी सहित भाजपा के ‘मित्रों’ के नाम बैंक चोरों की लिस्ट में डाले हैं।
इसीलिए संसद में इस सच को छुपाया गया। pic.twitter.com/xVAkxrxyVM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 28, 2020
भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीचं नावही समाविष्ट आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी यासाठी ही माहिती मागवली होती कारण राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी आरटीआय अंतर्गत हा अर्ज केल्याचं त्यांनी सांगितले.
जे सत्य मोदी सरकारने लपवलं त्याची माहिती आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिलच्या उत्तरामध्ये दिली आहे. ज्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरबीआयच्या उत्तरात ६८ हजार ६०७ कोटी रक्कमेचा थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत. देशातील सर्वोच्च बँकेने सुप्रीम कोर्टाच्या १६ डिसेंबर २०१५ च्या निकालाचा हवाला देत कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे.
परंतु याच मेहुल चोक्सीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तो भारतातून फरार होण्यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात “मेहुल-भाई” बोलले होते. याची कल्पना ईडीला होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदी मेहुल चोक्सीला ‘मेहुलभाई” बोलल्याचं व्हिडिओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला होता आणि तोच व्हिडिओ आम्ही आज तुमच्यासोबत पुन्हा शेअर करत आहोत.
News English Summary: Former Congress president Rahul Gandhi has once again attacked the Modi government at the Center. Rahul Gandhi has alleged that the central government is hiding the names of those who have sunk crores of rupees in the country. “The RBI has now added the names of BJP friends, including Nirav Modi and Mehul Choksi, to the list of ‘bank thieves’,” Gandhi was quoted as saying in Parliament.
News English Title: Story congress MP Rahul Gandhi twitter reaction over willful defaulter list Reserve Bank of India reply through RTI News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
-
Multibagger Stocks | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 77 लाख करणारा हा शेअर खरेदी करा | 75 टक्के परतावा मिळेल
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Swathi Sathish Surgery | या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरी भोवली | फेमच्या नादात सुंदर चेहरा कुरूप झाला
-
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
-
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
TDS New Rules | भेटवस्तूंवर सुद्धा 10 टक्के टीडीएस | 1 जुलैपासून लागू होणारे हे नवे नियम लक्षात ठेवा
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या