14 December 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

कोरोनाने ३० लाखांपेक्षा जास्त बळी जातील, तर १०० कोटी लोकांना लागण होईल: इंग्लंड IRC

UK IRC Report, Corona Crisis Covid 19

लंडन, २८ एप्रिल: करोनाच्या जागतिक साथीमध्ये चीनच्या भूमिकेची चौकशी करायला हवी या अमेरिकच्या मागणीनंतर चीनने टीका केली आहे. करोना साथीला प्रतिसाद देताना अमेरिकेची चूक झाल्याचा दावा करून, अमेरिकेने ही चूक मान्य करावी, असे चीनने म्हटले आहे. ‘अमेरिकेतील लोक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेकडे अमेरिका लक्ष देईल, अशी आशा आम्ही करतो. जागतिक आरोग्य संघटनेलाही (डब्ल्यूएचओ) या तपासात बोलावता येऊ शकते,’ असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सोमवारी सांगितले.

दुसरीकडे आपल्याला अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे. खूप काम करायचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटलं आहे. जर आपण योग्य पावलं उचलली तर करोनची दुसरी लाट रोखू शकतो असा विश्वास टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे.

त्यानंतर ब्रिटनच्या इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीने मोठं भाकित केलं आहे. कोरोनामुळे जगभरात तब्बल १०० कोटी लोक बाधित होतील आणि त्यामुळे ३० लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी जाईल अशी भीती IRCने व्यक्त केली आहे. IRCचे प्रमुख डेव्हिड मिलीबँड यांनी तयार केलेल्या अहवालात हा भीतीदायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

IRCच्या मतेऔषध निघून त्याचा वापर सुरू व्हायला जास्त वेळ लागणार आहे. तोपर्यंत कोरोना आणखी पसरणार आहे. यात आफ्रिका आणि आशियातले गरीब देश सर्वाधिक भरडले जाणार आहेत. या देशांजवळ आर्थिक पाठबळ नाही आणि आरोग्यविषयक सुविधाही नाहीत. त्यामुळे जगातले ३४ देश यात पीडित ठरणार आहेत.

 

News English Summary: Britain’s International Rescue Committee has made a big prediction. The IRC fears that the corona will infect as many as 100 million people worldwide and kill more than 3 million people. The report, prepared by IRC chief David Miliband, makes this alarming prediction.

News English Title: Story Corona virus will kill more than 30 lakh people while 100 crore people are at risk of infection UK IRC Report News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x