गुजरात: कोरोना नष्ट करण्यासाठी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री करा - भाजप खासदार

गांधीनगर, ९ मे: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तर दुसरीकडे देशातल्या जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) या जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे का, याचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे.
मागील २४ तासांमध्ये देशात ३३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ६६२ इतकी झाली आहे. यापैकी ३९ हजार ८३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १७ हजारहून अधिक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अशावेळी भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.
कोरोनामुळे गुजरातमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ४५० हून अधिक आहे. गुजरातमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या सहा टक्के रुग्णांचा मृ्त्यू होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. ही टक्केवारी देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा विचार करता अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री पदी नियुक्त करावं अशी मागणी स्वामी यांनी ट्विटवरुन केली आहे. “गुजरातमध्ये कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करायची असल्यास आनंदीबेन पटेल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Gujarat can be stabilised for Coronavirus Casualty numbers only if Anandibehn Patel returns as CM
— Subramanian Swamy (@Swamy39) May 8, 2020
News English Summary: In Gujarat, Anandiben Patel should be made the Chief Minister again if the number of patients suffering from corona is to be reduced, Swamy said in his tweet.
News English Title: Story corona virus Anandiben Patel returns as Chief Minister is only option to stabilized Gujarat covid 19 casualty says BJP MP Subramanian Swamy News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER