12 December 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

मोदींच्या मंत्रिमंडळातील कोरोना संशयित रुग्ण म्हणून या मंत्र्याला कॉरंटाईन शिक्का...सविस्तर

Corona Virus Crisis

नवी दिल्ली, १७ मार्च: राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ३८ जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच आता घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. घरी क्वारंटाइन केलेल्या लोकांच्या हातावर एक विशिष्ट शिक्का मारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. शिक्का मारल्यानंतर हे लोक बाहेर दिसले तर, ते घरी क्वारंटाइन आहेत हे कळू शकेल. अशा लोकांनी घरातच राहावे, असंही टोपे यांनी सांगितलं होते.

तसेच सरकारी कार्यालयांमधील बायोमेट्रिक प्रणालीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. त्यामुळे उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना हजेरी पटावर उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

केंद्रीय पातळीवर देखील मोदी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय राज्य मंत्री व्ही मुरलीधरन हे १४ मार्चला त्रिवेंद्रममधील मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये बैठकीसाठी गेले होते. यावेळी या बैठकीला स्पेनहून परतलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे. यामुळे परदेशातील मोठमोठ्या नेत््यांना कोरोनाची लागण झालेली असताना भारतातही राजकीय नेत्यांना व्हायरसने वेढले आहे.

मोदी सरकारमधील केंद्रीय राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वत:ला कोरोना संशयित रुग्ण म्हणून घरीच व्कारनटाईन केले आहे. क्वारनटाईन म्हणजे संशयितास १४ दिवसांसाठी अन्य लोकांच्या संपर्कापासून लांब ठेवले जाते. जगभरात अनेक नेत्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे हा आजार पसरू नये म्हणून मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे.

 

News English Summery:  Even at the central level, the Modi government has taken several measures. Meanwhile, Union Minister of State for Home V V Muralitharan had visited March 14 at a medical institute in Trivandrum. At this time, Muralitharan has taken care that a doctor returning from Spain had a coronary infection. It has infected a large number of foreign leaders with coroners while political leaders in India have also been infected with the virus. Union Minister of State in the Modi government Muralitharan has identified himself as a suspected corona patient at home. Quarantine means the suspect is kept out of contact with other people for 14 days. Many leaders, families, and families worldwide have been exposed to Coronas. Muralitharan has taken care not to spread the disease.

 

News English Title: Story Corona Virus shocking Corona suspected Union Minister in PM Narendra Modi government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x