कोरोनाबद्दलची लोकांच्या मनातील भीती दूर करण्यात सरकार अपयशी ठरतंय
नवी दिल्ली, ८ मे: देशव्यापी लॉकडाऊन समाप्त करण्याच्या योजनेबाबत केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवण्याची आवश्यकता असल्याचे असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. देशातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणायची असेल तर विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने विश्वास ठेवण्याचीही गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सर्वप्रथम या लॉकडाऊनची मोठी झळ बसलेल्या लोकांना तात्काळ मदत पुरविली पाहिजे. अन्यथा आपण काहीच करु शकणार नाही. काँग्रेसने आखलेल्या न्याय योजनेप्रमाणे या लोकांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ पैसे जमा केले पाहिजेत. स्थलांतरित कामगार, गरीब आणि लघुद्योगांना आजच आर्थिक मदत केली पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर मदत करून काही फायदा होणार नाही. कारण, या उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्सचं ऑडिट होण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले. ‘पीएम केअर्सचं ऑडिट आवश्यक आहे. पीएम केअर्समधला किती पैसा खर्च झाला आणि त्यात किती पैसा यायला हवा, हे जनतेला कळायला हवं,’ असं राहुल गांधींनी म्हटलं. पीएम केअर्समध्ये जमा होणारा निधी, त्याचा खर्च याबद्दल पारदर्शकता गरजेची असल्याचं ते म्हणाले.
लोकांच्या मनात कोरोनाबद्दल भीती आहे आणि ती भीती दूर करण्यात सरकार अपयशी ठरत आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊन नेमका कधीपर्यंत चालणार, हे सरकारनं स्पष्टपणे सांगायला हवं. कोरोना संकट केवळ एक टक्के जनतेसाठी धोकादायक आहे. मात्र ९९ टक्के लोकांच्या मनात त्याची भीती आहे. ही भीती सरकारनं दूर करण्याची गरज असल्याचं राहुल म्हणाले.
आर्थिक अडचणीमुळे अनेक किलोमीटरचा प्रवास या मजुरांना पायीच करावा लागत आहे. मात्र या मुद्द्यावर बोलताना राहुल म्हणाले की, सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही. पुरवठा साखळी आणि आरोग्य यंत्रणेमुळे आमची रेड, ऑरेज आणि ग्रीन झोन व्यवस्था विस्कळीत झाली आहे, असेही ते पुढे म्हणाले. स्थलांतरित कामगार आणि गरिबांना त्वरित पैशांची गरज आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) तातडीने निधीची आवश्यकता आहे, अन्यथा रोजगाराअभावी त्सुनामीसारखी परिस्थिती उद्भवेल, याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले आहे.
News English Summary: “People have fears about Corona and the government is failing to allay those fears,” he said. The government should make it clear exactly how long the lockdown will last. The Corona crisis is dangerous for only one percent of the population. But 99 percent of people are afraid of it. Rahul Gandhi said the government needs to address this fear.
News English Title: Story government needs to give transparency on exit plan of lockdown says former president of congress MP Rahul Gandhi News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News