2 May 2025 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

उतावळ्या तळीरामांची संख्या पाहता कोरोनाची लागण वाढण्याची शक्यता

Lockdown, liquor Shops

मुंबई, ४ मे: देशभरात लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आजपासून रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याबरोबरच आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली.

मुंबईच्या बोरिवली परिसरात मद्यशौकिनांनी वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रांग लावल्याचे दिसून आले. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने या सगळ्यांचे वांदे झाले होते. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे आजपासून या शौकिनांना दिलासा मिळणार आहे. मात्र, राज्य सरकाराकडून दारुची दुकाने सुरु ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

एकीकडे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच ग्रीन आणि ऑरेंज झोनसह रेड झोनमधील काही उद्योग, व्यवसासांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली असून, १ मे ते ३ मे या अवघ्या तीन दिवसांच्या काळात देशात कोरोनाचे तब्बल साडे सात हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजारांच्या वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत पंजाब आणि दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे तळीरामांची संख्या पाहता कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

News English Summary: The third phase of lockdown across the country has started from today. Starting today, Red, Orange and Green zones have been given some discounts. In addition, liquor shops have been allowed to open across the country from today. People who have been away from liquor for the last one and a half months have been queuing in front of liquor shops since this morning to get relief.

News English Title: Story lockdown see what is situation in some part of country after liquor shops opens News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या