12 December 2024 9:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

रेल्वे मंत्रालय PM केअर फंडाला १५१ कोटी देतं आणि मजुरांवर भाडं आकारातं - राहुल गांधी

Rahul Gandhi, Covid 19, Rahul Gandhi, Migrants Issue, Lockdown

नवी दिल्ली, ४ मे: केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांनी सोमवारी एक पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी मजूर आणि कामगारांना घरी पाठवण्यासाठी येणारा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचे जाहीर केले. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सरकारने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली. रेल्वे परिपत्रकानुसार स्थानिक सरकारी अधिकारी सर्व पडताळणी करून मजुरांना तिकिटे देतील आणि त्यांच्याकडून तिकीट भाडे आकारले जाईल. मजूर आणि कामगारांकडून आकारण्यात येणारी तिकिटाच्या स्वरूपातील एकूण रक्कम ते अधिकारी रेल्वेला देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे सोनिया गांधींनी मजुरांच्या तिकिटाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केले असतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांकडून तिकीट भाडे आकारत आहे, तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडाला १५१ कोटी रुपये देत आहे. ही गुंतागुंत जरा सोडवून द्या, असा टोलाही त्यांनी रेल्वे मंत्रालयाला हाणला आहे.

 

News English Summary: On the one hand, while Sonia Gandhi has announced that the Congress will bear the cost of labor tickets, Rahul Gandhi has attacked the Modi government. Railways is charging ticket fares from stranded laborers in other states, while the Railway Ministry is paying Rs 151 crore to the PM Care Fund. He has also asked the Railway Ministry to resolve the issue.

News English Title: Story congress MP Rahul Gandhi comments railway ministry giving 151 crores donations states PM Care fund News Latest Updates.

 

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x