दिल्लीत एकाच इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा

दिल्ली, २ मे: दक्षिण-उत्तर दिल्लीतील डीएम ऑफीसकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल रोजी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे तीनपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यावर परिसर सील करण्यात येतो. मात्र येथे असलेल्या दाट लोकवस्तीमुळे एक रुग्ण सापडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला होता.
येथील सर्व लोकांचा कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून, त्यामध्ये या इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एकूण ३ हजार ७३८ कोरोनाबाधित आहेत. तसेच दिल्लीमध्ये आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मात्र समाधानाची बाब म्हणजे दिल्लीत आतापर्यंत ११६७ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिल्लीला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाधिक कोरोना चाचण्या घेण्यावर भर दिला आहे.
देशभरातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली ३७,३३६ वर, त्यांपैकी एकूण ९,९५० रुग्ण बरे झाले. तसेच करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली १,२१८ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी दोन आठवडय़ांसाठी टाळेबंदी वाढवितानाच आरोग्य मंत्रालयाने देशभरातील करोनाबाधित लाल, नारंगी आणि हिरव्या श्रेणी (झोन) जाहीर केल्या आहेत. देशभरातून १३० जिल्हे हे लाल श्रेणीत आहेत, तर २८४ जिल्हे हे नारंगी श्रेणीत आणि ३१९ जिल्हे हे हिरव्या श्रेणीत आहेत.
News English Summary: The building was sealed on April 19 after a corona-positive patient was found here, according to information received from the DM’s office in south-north Delhi. The premises are usually sealed when more than three patients are found. However, due to the dense population, the area was sealed off as a precaution after a patient was found.
News English Title: Story shocking 41 test corona Covid 19 positive from same building in Delhis Kapashera News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC