20 June 2021 3:34 PM
अँप डाउनलोड

गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, १७ मे | करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी कोरोना संसर्गाचे गांभीर्य कमी करणे किंवा मृत्यू टाळण्यासाठी ही थेरपी फार लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना उपचारांतील वैद्यकीय निर्देशांतून ही थेरपी काढून टाकली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

काही डॉक्टर व शास्त्रज्ञांनी याबाबत प्रमुख शास्त्रज्ञ-सल्लागार के. विजय राघवन यांना पत्र पाठवून प्लाझ्मा थेरपी अतार्किक असल्याचे म्हटले होते. शिवाय, याचा शास्त्रशुद्ध वापर होत नसल्याने इशाराही दिला होता. हे पत्र आता आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव व एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर व्हॅक्सिनोलॉजिस्ट गगनदीप कंग, सर्जन प्रमेश सीएस आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

News English Summary: The death toll from the corona is still raging across the country. According to the Union Ministry of Health, 2,81,386 new coronaviruses have been detected in the country in the last 24 hours and 3,78,741 people have returned home after overcoming coronavirus.

News English Title: The death toll from the corona is still raging across the India news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x