नवी दिल्ली, १२ ऑगस्ट | काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हँडल लॉक करण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना इंडियन नॅशनल काँग्रेसने फेसबूकवर लिहिले, की आमच्या नेत्यांना तुरुंगात डांबले तेव्हा आम्ही घाबरलो नाही आता काय घाबरणार? आम्ही काँग्रेस आहोत, जनतेचा आवाज आहोत. बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी आवाज उठवणे गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा-पुन्हा करू असेही काँग्रेसने लिहिले आहे.
तत्पूर्वी ट्विटरने शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते बंद केले होते. यानंतर ट्विटर खाते लॉक करण्यात आले होते असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, बुधवारी रात्री सुद्धा काँग्रेसच्या इतर 5 मोठ्या नेत्यांचे ट्विटर अकाउंट लॉक झाले असा दावा करण्यात आला. यामध्ये पक्षाचे सरचिटणीस आणि माजी मंत्री अजय माकन, लोकसभेतील पार्टी व्हिप मणिकम टागोर, आसामचे काँग्रेस प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचा समावेश होता.
View this post on Instagram
बलात्कार पीडितेच्या आईचा फोटो केला होता ट्वीट:
दिल्लीतील कँट परिसरात झालेला बलात्कार देशभर चर्चेत आहे. अशात काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच पीडितेच्या कुटुंबासोबत झालेल्या भेटीचा फोटो ट्वीट केला. यावरूनच ट्विटरने नियमांचा दाखला देत राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलवर कारवाई केली होती. ट्विटरने राहुल गांधींचे ते ट्विट सुद्धा डिलीट केले.
दिल्ली पोलिसांसह ट्विटरकडे तक्रार दाखल:
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (NCPCR) ने या ट्विटच्या मुद्द्यावरून दिल्ली पोलिसांसह ट्विटरकडे तक्रार केली आहे. NCPCR ने पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो जारी केल्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. आयोगाने यास बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा पोक्सोचे उल्लंघन असेही म्हटले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Twitter India Locks Indian National Congress Twitter Handle under Policy news updates.
