4 May 2025 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महत्वाची बैठक; १ जूनपुढील योजना?

Modi government, Covid 19, lockdown lifted

नवी दिल्ली, २९ मे : आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि कॉरेंटाईन सुविधा या बाबींची जबाबदारी असलेल्या केंद्र सरकारच्या पॅनलने मोदी सरकारला लॉकडाऊनबाबत काही शिफारशी केल्या आहेत. यापुढे लॉकडाऊन वाढवण्यात येऊ नये, अशी शिफारस केल्याचं वृत्त ईटीने दिलं आहे. लॉकडाऊन ४ हे ३१ मे रोजी संपणार आहे. पण त्यानंतर काय असा प्रश्न पडलेला असतानाच या पॅनलने सरकारसमोर एक्झिट प्लॅन सादर केला आहे.

‘देशात आता राष्ट्रीय लॉकडाऊन सुरू ठेवू नये असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जिथे केसेस वाढत आहेत, तिथे अत्यंत आक्रमकपणे चाचण्या आणि ट्रेसिंगसह कडक निर्बंध ठेवणे आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया या गटातील एका सदस्याने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राज्यांच्या मागणीचा विचार केल्यास लॉकडाऊन ५ चा टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच या टप्प्यात अन्य व्यवसायांनाही सूट दिली जाऊ शकते. मात्र, ज्या शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता याकडे केंद्र सरकार जास्त लक्ष केंद्रीत करणार आहे. शाळा-कॉलेज बंद राहण्याची शक्यता आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानोड्डानेही बंद ठेवण्यात येतील. धार्मिक स्थळांना सूट मिळू शकते. याचा निर्णय राज्य सरकारांवर देण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये सलून उघडले आहेत. तर जिम आणि शॉपिंग मॉल उघडण्याच्या निर्णयही राज्य सरकारांवरच सोपविला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकाता या ११ प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी ते देशात लॉकडाऊन वाढवला जाणार की नाही, यावर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: The central government panel, which is responsible for emergency medical services, availability of hospitals, segregation and quarantine facilities, has made some recommendations to the Modi government regarding lockdown. ET has recommended that the lockdown should not be extended any further.

News English Title: Two empowered government panels want Covid 19 lockdown lifted News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या