14 December 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Lockdown, Goa CMPramod Sawant

पणजी, २९ मे : देशातील चौथ्या टप्प्याचा लॉकडाउन येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे ३१ मे नंतर यासंदर्भात कोणता निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. अशातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन आणखी १५ दिवसांनी वाढवावा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. लॉकडाउनसंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत फोनवरून आज चर्चा केली. तसंच लॉकडाउन वाढवताना हॉटेल आणि जिमला काही अटींवर सुरू करण्याची परवानगी द्यावी, असं ही सावंत म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी गुरूवारी रात्री फोनवरून संवाद साधला होता. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवण्याची सल्ला दिला आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सावंत म्हणाले, “अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत लॉकडाउन १५ दिवसांनी वाढवायला हवा, असं सांगितलं. यात काही गोष्टी गोष्टी सुरु करण्यास मूभा द्यावी. ५० टक्के क्षमतेनं आणि सोशल डिस्टसिंग पाळून हॉटेल सुरू करायला हवी. त्याचबरोबर व्यायामशाळा (जिम) सुरू व्हाव्यात अशी अनेक लोकांची मागणी आहे. करोना रुग्ण संख्येचा आकडा कमी करण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन अतिशय गरजेचा आहे,” असं सावंत यांनी सांगितलं.

राज्याला जेवढे स्वातंत्र्य असेल त्यानुसार पाऊले उचलली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. काहीजण मॉल सुरू करा अशीही मागणी करतात त्याविषयीही सरकार विचार करील. गोव्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय याचीही नोंद सरकारने घेतली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

News English Summary: The fourth phase of lockdown in the country will end on May 31. Therefore, all eyes are on what decision will be taken in this regard after May 31. Similarly, Goa Chief Minister Pramod Sawant has demanded that the lockdown be extended for another 15 days to Union Home Minister Amit Shah.

News English Title: Lockdown Must Be Extended For 15 More Days Goa Chief Minister Pramod Sawant News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x