28 March 2023 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

UPSC परीक्षेचा घोळ मिटला, या तारखेला होणार परीक्षा

UPSC, MPSC, Civil Services Prelims Exam, Sarkari naukri, Police Bharti

नवी दिल्ली, ५ जून: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व आणि मुख्य परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता, हा संभ्रम दूर झाला असून या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, युपीएससीची पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी तर, मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच काम ठप्प झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांवरही यांचा परिणाम झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली.

त्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. या संदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

 

News English Summary: It was decided by the Central Public Service Commission to postpone the UPSC Prelims (Pre-Examination) and Main (Main) examinations. For the past few days, there has been talk of setting a date for the exam. Finally, the commission has announced the date of the examination. A meeting was held today to decide the dates of various examinations and interviews to be conducted by the commission. The meeting fixed the dates for the pre- and main examinations.

News English Title: UPSC Civil Services Prelims Exam 2020 New Dates Announced News latest updates.

हॅशटॅग्स

#UPSC(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x