1 May 2025 11:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

२०२२ मधील यूपीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये चिंता | मोदी-शहा आणि RSS दरम्यान गुप्त बैठका

Uttar Pradesh Corona pandemic

लखनऊ, २३ मे | सध्या कोरोना आपत्तीमुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी देखील उत्तर प्रदेशात अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीमुळे उत्तर प्रदेशात हाहाकार मजल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि कोरोना आपत्ती २०२२ पर्यंत लांबणार असेच संकेत मिळत आहेत. परिणामी भाजप आणि आरएसएस’मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं वृत्त आहे. कारण उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये पराभव झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत देखील मोदी सरकार जाणार हे जवळपास निश्चित होणार आहे.

याच पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएस’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत बैठक झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आरोग्य व्यवस्था आणि गंगा नदी तसेच गंगा घाटावरील कोरोना मृतांचे शव देशातील चर्चचा विषय ठरला आहे. परिणामी स्वतः मोदींचा देखील २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतो किंवा मोदींचा मतदारसंघ बदलला जाऊ शकतो. अन्यथा मोदींना दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आधीच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

भाजपाला उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा कामी येणार नाही याचे संकेत नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत पाहायला मिळाले आहेत. कारण प्रभू रामाची भूमी म्हणजे अयोध्येत देखील भाजपचा पराभव होऊन समाजवादी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तसेच मथुरा आणि वाराणसीत देखील विरोधीपक्ष मोठा ठरला असून भाजपच्या वाट्याला अत्यंत कमी जागा आल्या आहेत. त्यानंतर भाजपमध्ये अजूनच चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेशात २०२२ यामध्ये मतदारांकडून मतं मागायची तरी कोणत्या विषयावरून हाच भाजपच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

 

News English Summary: Despite the current state of concern in the country due to the Corona disaster, the situation in Uttar Pradesh is dire. The Corona disaster has caused havoc in Uttar Pradesh. In particular, there are indications that Uttar Pradesh will hold assembly elections in 2022 and the Corona disaster will last till 2022. As a result, there is an atmosphere of concern between the BJP and the RSS.

News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BJP RSS is in worried about result after situation change due to corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या