12 October 2024 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

VIDEO | उत्तर प्रदेशातील रायबरेलीत अधिक पैसे घेऊन भिंतीतून दारू विक्री होतेय

liquor selling

रायबरेली, २८ मे | देशात गेल्या एका दिवसात आणखी दोन लाख ११ हजार २९८ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहोचली आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरून गेले असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या एका दिवसात करोनामुळे ३८४७ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ९९२ जण महाराष्ट्रातील आहेत तर आतापर्यंत एकूण तीन लाख १५ हजार २३५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ९१ हजार ३४१ जण महाराष्ट्रातील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. परिणामी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. मागील महिन्याभरापासून उत्तर प्रदेशातही कडक नियमावलीमुळे दारू विक्री बंद झाल्याने तळीराम उतावळे झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे दारू मिळविण्याचे चोरटे मार्ग सुरु झाले आहेत.

बीयर विक्री करणाऱ्या दुकानाचा मुख्य दरवाजा बंद ठेवून भिंतीमधून दारूच्या बाटल्या विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांकडून अधिक रक्कम घेतली जात आहे. ग्राहकांना दारू पुरवण्यासाठी भिंतीत होल तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून संध्याकाळी ७ नंतरही सर्रासपणे दारूची विक्री केली जाते. विदेशी मद्यासाठी २० ते १०० रुपये अधिक आकारले जात आहेत. तर बीयरच्या एका कॅन आणि बाटलीमागे २० ते ५० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत.

महामार्गांच्या शेजारी असलेल्या दारुच्या दुकानांमधून सर्रासपणे कायद्यांचं उल्लंघन सुरू आहे. या भागात गस्त घालणारे पोलीसदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडे संशयानं पाहिलं जात आहे. मागच्या बाजूनं दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी याची माहिती तळीरामांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी काही विशेष व्यक्तींवर सोपवली आहे. या व्यक्ती दुकानाच्या परिसरात उपस्थित असतात आणि तळीरामांना दुकानातून मागून दारू विकली जात असल्याची माहिती पुरवतात.

 

News English Summary: Bottles of liquor are being sold through the walls, keeping the main door of the shop selling beer closed. What is special is that more money is being taken from the customers for this. A hole has been made in the wall to supply alcohol to the customers. Through this, liquor is widely sold even after 7 pm. 20 to 100 rupees more is being charged for foreign liquor. An extra Rs 20 to Rs 50 is being charged for a can and bottle of beer.

News English Title: Uttar Pradesh Raebareli video viral liquor selling illegally through walls news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x