26 April 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

प. बंगालमध्ये ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही - पंतप्रधान

West Bengal government, CM Mamata Banerjee, PM Narendra Modi

कोलकत्ता, 23 फेब्रुवारी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ‘सिंडिकेट राज’ चिरस्थायी केले असून, ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही, असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आपल्या मतपेढीचे संरक्षण करण्यासाठी तृणमूल काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असून, आपला सांस्कृतिक वारसा व मानचिन्हे याकडे दुर्लक्ष करत आहेत, असाहीआरोप मोदी यांनी केला.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुषमान भारतसारख्या योजनांच्या लाभापासून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे शेतकरी, गरीब व्यक्तींना वंचित ठेवले. स्वातंत्र्यसेनानी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ज्या घरात वंदेमातरम्‌ हे गीत लिहिले, ते घर मोडकळीस आले आहे. बंगाली अस्मितेच्या प्रतिकांकडे ममता बॅनर्जी यांनी कसे दुर्लक्ष केले, याचे हे ढळढळीत उदाहरण आहे असं मोदी म्हणाले.

 

News English Summary: In West Bengal, Prime Minister Narendra Modi on Monday lashed out at the Mamata Banerjee government for perpetuating “syndicate rule” in all walks of life and for not doing anything for the common man without giving “cut money”.

News English Title: West Bengal government not doing anything for the common man without giving cut money said PM Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x