
Insurance Policy Alert | बऱ्याच सर्व सामान्य कुटुंबांमध्ये कुटुंबप्रमुख त्याचबरोबर नोकरी पेशामध्ये असणारा कोणताही व्यक्ती आयुर्विमा काढतो. आयुर्विमामुळे अचानक अपघात, किंवा काही कारणांमुळे मृत्यू झाला तर, आयुर्विमा खातेधारकाच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी विमा कंपनी फायद्याची ठरते. तुमच्यापैकी अनेकांनी आयुर्विमा पॉलिसीचा लाभ घेतला असेल. आज आम्ही तुम्हाला या पॉलिसी बद्दलच्या नवीन नियमानविषयी माहिती सांगणार आहोत.
वीमा नियामक क्षेत्र IRDAI ने 2024 च्या 1 ऑक्टोबरपासून नवीन नियमावली लागू केली आहे. या नवीन नियमामध्ये पॉलिसीधारकाने त्याची पॉलिसी सरेंडर केली तर, त्याला अधिक परतावा मिळणार आहे. नवीन नियमानुसार विमा कंपन्यांना पॉलिसीवर एक सरेंडर व्हॅल्यू द्यावी लागेल. या कारणामुळे तुम्हाला तुमची पॉलिसी सरेंडर करणे सोपे होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जास्त परतावा देखील मिळेल.
या प्रकारच्या पॉलिसींसाठी बदलले नियम :
विमा पॉलिसीच्या नव्या नियमानुसार गॅरंटी सरेंडर मूल्य नियमांच्या येण्याचे तीन मुख्य फायदे अनुभवता येतील. पॉलिसीधारकाने पॉलिसी सरेंडर केल्याबरोबर त्याला आधीपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पारंपारिक जीवन विमा त्याचबरोबर गैरसहभागी, आणि बोनस आधारित पॉलिसी शामिल आहेत.
1 वर्षात मिळणारा परतावा :
समजा एखाद्या व्यक्तीने पॉलिसीकरिता 5 लाखांची पॉलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली आणि सर्वात पहिल्या वर्षाला 50 हजारांचा प्रीमियम भरून जुन्या नियमाप्रमाणे एका वर्षानंतर पॉलिसी सरेंडर केली तर, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा परतावा मिळणार नाही. याचाच अर्थ पॉलिसीधारकाचे सर्व पैसे बुडून जातील. परंतु नवीन नियम असं सांगतात की एका वर्षानंतर पॉलिसी सरेंडर केल्यावर शंभर टक्के परतावा मिळेल. विमा कंपनीने संपूर्ण वर्षांसाठी प्रीमियम मिळवला असेल तर, खातेधारकाला 31,295 रुपये परत द्यावे लागतील.
आर्थिक नुकसान नियंत्रित केले जाऊ शकते :
नवीन नियमांच्या घोषणेनंतर विमा कंपन्यांनी कमिशनची रचना बदलण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. कारण की नवीन नियमानुसार नफा वाचवला जाऊ शकतो. यांपैकी काही कंपन्या 50-25-25 या मॉडेलचा उपयोग करू शकतात. याचाच अर्थ असा की, एजंटचे 50% कमिशन त्याला पहिल्याच वर्षी दिले जाईल आणि बाकीचे उर्वरित कमिशन दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी विभागून दिले जाईल. त्याचबरोबर काही कंपन्या ट्रेल कमिशनचा विचार करू पाहत आहेत. यामध्ये पॉलिसीच्या वेळेतच पैसे दिले जाऊ शकतात. एवढंच नाही तर, लवकर सरेंडर केल्यानंतर होणार नुकसान देखील टाळले जाऊ शकते.
पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा जास्तीचा परतावा :
गुंतवणूक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जुन्या पॉलिसी नियमाप्रमाणे चौथ्या आणि सातव्या वर्ष दरम्यान पॉलिसी सरेंडर केली तर एकूण 50% प्रीमियम भरणे अनिवार्य होते. समजा तुम्ही 4 वर्षांसाठी पॉलिसी सरेंडर करत आहात तर, पूर्वीच्या सरेंडर नियमांप्रमाणे 1.2 लाख रुपये परत मिळाले असते. परंतु नवीन नियमांचा अहवाल लक्षात घेता पॉलिसी सरेंडर केल्यानंतर तुम्हाला 1.55 लाख रुपयांचा परतावा मिळेल.