 
						Money Investment | LIC आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना लाँच करत असते. LIC योजना तयार करताना समाजातील सर्व स्तरातील लोकांचा विचार करते. काही दिवसांपूर्वी LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या जीवन विमा पॉलिसीमध्ये LIC कंपनीने अनेक प्रकारचे आकर्षक लाभ जाहीर केले आहे. LIC च्या या जीवन विमा योजनेअंतर्गत लोकांना पुन्हा पुन्हा पॉलिसी प्रीमियम भरावा लागणार नाही, कारण ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. आपण ज्या योजनची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, “LIC धनवर्षा जीवन विमा पॉलिसी”.
एलआयसी धनवर्ष योजना :
LIC धन वर्षा पॉलिसी ही एक नॉन लिंक वैयक्तिक बचत एकल प्रीमियम स्कीम आहे. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. ही गुंतवणूक योजना सुरक्षितता आणि बचत असे दोन्ही फायदे देते. LIC धन वर्षा योजना सर्व आर्थिक श्रेणीतील लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. एलआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, जर पॉलिसी धारकाचा मुदतीदरम्यान मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीनंतरही पेमेंटची हमी दिली जाते. LIC च्या मते, ही योजना वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय अशा दोन्ही गोष्टीसाठी उपलब्ध आहे.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातील.
पर्याय 1:
जर तुम्ही LIC जीवन धनवर्षा योजनेचा पहिला पर्याय निवडला तर जमा केलेल्या प्रीमियमच्या तुलनेत 1.25 पट अधिक विमा रक्कम ऑफर केली जाईल. जर एखड्या व्यक्तीने LIC च्या या योजनेत 10 लाखांचा एकरकमी प्रीमियम भरला आणि प्रीमियम दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर त्याला 12.5 लाखांचा अतिरिक्त जीवन विमा बोनस दिला जाईल.
दुसरा पर्याय:
जर तुम्ही LIC धनवर्षा योजनेचा दुसरा पर्याय निवडला तर जमा केलेल्या प्रीमियम रकमेवर तुम्हाला 10 पट अधिक जोखीम कव्हर दिले जाईल. या योजने अंतर्गत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याला 10 लाख रुपयांच्या सिंगल प्रीमियमऐवजी 1 कोटी रुपयांचा जीवन विमा हमी बोनस दिला जाईल.
योजनेचे फायदे :
तुम्हाला आता वाटेल की या योजनेतील पहिला पर्याय निवडून फायदा काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार, कारण दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला 10 पट अधिक लाईफ रिस्क कव्हर दिले जाते. खरेतर पहिल्या पर्यायात तुम्हाला जास्त बोनस मिळेल. LIC चा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहे. या योजनेत दोन टर्म पर्याय उपलब्ध आहेत, 10 वर्षे आणि 15 वर्षे. 10 वर्षे मुदतीचा प्लॅन घेण्यासाठी वय मर्यादा किमान वय 8 वर्षे आणि कमाल 60 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 15 वर्ष मुदतीचा प्लॅन घेण्यासाठी वय मर्यादा किमान 3 वर्षे निश्चित करण्यात आली आहे . या स्कीममध्ये गुंतवलेले पैसे पेन्शन रूपाने ही घेऊ शकता.
पेन्शन समान लाभ :
LIC च्या धनवर्षा पॉलिसीमध्ये तुम्हाला कर्ज आणि सरेंडर सुविधाही दिली जाईल. याशिवाय या योजनेअंतर्गत नॉमिनीला मिळालेले पैसे एकाच वेळी न काढता मासिक पेन्शन सारखे ही घेता येईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		