12 December 2024 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

Life Insurance Claim | तुमच्या आयुर्विम्याचे दावे फेटाळण्यामागे कोणती कारणं असतात?, त्यासाठी या गोष्टी कायम लक्षात ठेवा

Life Insurance Claim

Life Insurance Claim | आज विमा खूप महत्त्वाचा बनला आहे. आयुर्विमा असो वा आरोग्य विमा, आता त्याबाबतची जागरूकता वाढली असून आता अधिक संख्येने लोक विमा पॉलिसी घेऊ लागले आहेत. पण, कोणत्याही प्रकारचा विमा घेण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विमा पॉलिसीशी संबंधित सर्व माहिती असेल तर क्लेम घेणं सोपं जाईल आणि कोणतीही अडचण येणार नाही.

आयुर्विम्याचा दावा फेटाळला गेला, तर तो अत्यंत क्लेशदायक ठरतो. आयुर्विमा घेणारी व्यक्ती ही घरातील एकमेव कमावती व्यक्ती असेल आणि त्याच्या मृत्यूनंतर आयुर्विम्याचा दावा फेटाळला जात असेल, तर त्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नेहमी आयुर्विमा घेणाऱ्या पॉलिसीधारकांनी विम्याचा दावा फेटाळण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या गोष्टींची माहिती ठेवावी.

चुकीची माहिती :
लिव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार विमाधारक व्यक्तीने आयुर्विमा घेताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असेल तर विमा दावा फेटाळण्याची शक्यता वाढते. पॉलिसी घेताना आरोग्य, वय, वजन, उंची किंवा उत्पन्न याबाबत चुकीची माहिती देणे, विमाधारकाने चुकीची माहिती दिल्यास विम्याचा दावा फेटाळला जाऊ शकतो.

प्रीमियम वेळेवर न भरणे :
जेव्हा विमाधारकाने वेळेवर हप्ते भरले तेव्हाच जीवन विमा सक्रिय असतो. विमा कंपन्या हप्ता देय असताना तो भरण्यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधीही देतात. स्क्रिपबॉक्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी अनुप बन्सल सांगतात की, जर विमाधारकाने ग्रेस पीरियडमध्येही प्रीमियम भरला नाही तर पॉलिसी लॅप्स होते.

कांटेस्‍ट पीरिअड :
विमा पॉलिसी घेतल्याच्या दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीला कांटेस्‍ट पीरिअड असे म्हणतात. या काळात विमाधारकाच्या मृत्यूवर विमाधारकाने केलेला विमा दावा विमा कंपनी नाकारते. मात्र, सर्व विम्याचे दावे नाकारले जातात, असे नाही. कांटेस्‍ट पीरिअडमध्ये मृत्यू झाल्यावर विमाधारकाने चुकीची माहिती देऊन विमा पॉलिसी घेतली आहे का, हे पाहण्यासाठी विमाधारकाने दिलेल्या माहितीची विमा कंपनी कसून चौकशी करते.

नॉमिनी नसणे :
सहसा, पॉलिसीधारक त्यांच्या पालकांना नामनिर्देशित करतात. अनेक वेळा असे होते की नॉमिनीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर विम्याचा दावा केला जातो. अशावेळी नॉमिनी नसल्यास विम्याचा दावा फेटाळला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Life Insurance Claim rejection reasons check details 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Life Insurance Claim(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x