5 June 2023 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Hi-Tech Pipes Share Price | मस्तच! स्टॉक स्प्लिटच्या घोषणा आणि कमी दिवसात 76% परतावा, या शेअरची डिटेल्स पहा

Hi Tech Pipes Share Price

Hi-Tech Pipes Share Price | हाय टेक पाईप्स कंपनी नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1 : 10 या प्रमाणात शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी हायटेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 3.26 टक्के घसरणीसह 896.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये माहिती दिली की, संचालक मंडळाने कंपनीचे सध्याचे इक्विटी शेअर्सचे दहा तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहा रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स एक रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दहा शेअर्समध्ये विभाजित केले जातील. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली नाही. हाय टेक पाईप्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)

सहा महिन्यात तिला 76 टक्के परतावा :
मागील एका महिन्यात हायटेक पाईप कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्क्यांनी वाढली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये हायटेक पाईप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 68 टक्क्यांनी वाढली होती. हाय टेक पाईप ही पोलाद प्रक्रिया करणारी कंपनी असून ती स्टील पाईप्स, होलो सेक्शन्स, ट्यूब्स, कोल्ड रोल्ड कॉइल्स आणि स्ट्रिप्स, रोड क्रॅश बॅरियर्स आणि सोलर माउंटिंग स्ट्रक्चर्स उत्पादने बनवते. या तिमाहीत कंपनीचे एकूण विक्रीचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले असून 91,232 टनवर पोहचले आहे. कंपनीचा EBITDA या तिमाहीत 12 टक्के वाढीसह 28.07 कोटीवर गेला आहे, जो मागील वर्षी 25 कोटी रुपये होता.

तिमाही निकाल कामगिरी :
हाय टेक पाईप्स कंपनीने नुकतेच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या PAT मध्ये तिसऱ्या तिमाहीत 28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत कंपनीने 13.02 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 10.17 कोटी रुपये होता. या व्यतिरिक्त कंपनीचा ऑपरेशनल महसूल 29 टक्क्यांनी वाढून 569 कोटी रुपये झाला आहे, जो मागिल Q3FY22 मध्ये 440 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hi-Tech Pipes Share Price 543411 HITECH stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

Hi Tech Pipes Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x