Viral Video | अमेरिकेचे 80 वर्षीय राष्ट्राध्यक्ष जो बायडन पुन्हा एकदा एका कार्यक्रमादरम्यान कोसळले. यावेळी ही घटना कोलोराडोची आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष सुरक्षित असून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. मात्र, बायडन यांचा तोल बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी २०२४ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे असं वृत्त आहे.
कॉलोराडोयेथील एअरफोर्स अॅकॅडमीच्या पदवीदान समारंभात बायडन व्यासपीठावर कोसळले. प्रत्यक्षात व्यासपीठावर आलेल्या राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांशी हातमिळवणी केली. यानंतर ते आपल्या जागेवर परतत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. हे पाहून हवाई दलाचे अधिकारी तात्काळ धावले आणि त्यांनी बायडन यांना हात दिला.
टेलिप्रॉम्प्टरला आधार देण्यासाठी दोन पिशव्या
बायडेन यांना मात्र या घटनेचा फारसा परिणाम दिसला नाही. ते ताबडतोब स्वत:ला सावरले आणि सीटवर परतले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेजवर वाळूची पिशवी असल्याने ही घटना घडली. प्रत्यक्षात टेलिप्रॉम्प्टरला आधार देण्यासाठी अशा दोन पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. असे म्हटले जात आहे की 80 वर्षीय बायडन व्हाईट हाऊसमध्ये परतल्यावर या घटनेची खिल्ली उडवताना देखील दिसले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा टेलिप्रॉम्प्टर शिवाय भाषण करत नाहीत. समोर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला किंवा एखादी तांत्रिक अडचण आली की ते कसे गोंधळतात याचे अनेक किस्से कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहेत. त्याच टेलिप्रॉम्प्टरच्या आधारासाठी लावलेल्या पिशव्यांमुळे आज बायडन खाली पडले.
Joe Biden falls at the Air Force Graduation!
If he wasn’t such a creepy criminal I would feel sorry for him. But I don’t.????pic.twitter.com/R8Hpg1fm5x
— ??? Rachel ??? ✨#TRUMPWON✨ (@Rachel4Trump_45) June 1, 2023
याआधीही अशा घटना घडल्या आहेत
फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये अशाच घटना घडल्या आहेत, जिथे बायडेन कोसळले होते. जून 2022 मध्ये लॉस एंजेलिसला जाणाऱ्या विमानात चढताना ते पडले होते. याआधी मे 2022 मध्ये अँड्र्यूज एअरफोर्स बेसवर विमानात चढताना त्यांचा तोल गेला होता, पण त्यांनी लगेचच हँडरेलच्या मदतीने स्वत:ला सांभाळले होते.
मार्चमहिन्यात एअरफोर्स वन विमानात चढताना बायडेन पायऱ्यांवरून पडले होते. त्यावेळी ते सेल्मा दौऱ्यावरून परतले होते. विशेष म्हणजे अशा घटनांवरून रिपब्लिकन नेते सातत्याने बायडन यांच्यावर निशाणा साधत आहेत. ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
My friend just filmed Joe Biden @POTUS falling off his bike no joke. Just happened at Rehoboth Beach ? #JoeBiden #BidenIsAFailure #RehobothBeach #Trump #EpicFail #Biden pic.twitter.com/cVMycEwuI0
— jonboy (@jonboy79788314) June 18, 2022
News Title : Viral Video US President Joe Biden stumbles in air force academy ceremony check details on 02 June 2023.
