बोत्स्वाना: देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान देशभरामध्ये ‘ईव्हीएम हटाओ, बॅलट पेपर लाओ’ हा आवाज बुलंद होत असतानाच विदेशात देखील ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आफ्रिकेतील बोत्स्वानामध्ये निवडणुकीत ईव्हीएम वापरावे किंवा नाही यावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. विशेष म्हणजे बोत्स्वानामधील ज्या ईव्हीएमवरून वाद सुरू असून ते भारतात तयार करण्यात आले आहेत. हा वाद आता तिथल्या न्यायालयामध्ये पोहोचला आहे.
बोत्स्वानामध्ये सरकारने नियमांमध्ये बदल करत निवडणुकीसाठी ईव्हीएम वापरण्याचा घाट घातला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्ष बोत्स्वाना काँग्रेस पार्टीने कडाडून विरोध केला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बोत्स्वाना सरकार आणि निवडणूक आयोगाना हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाला बोत्स्वाना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये छेडछाड केली जावू शकत नाही हे विरोधी पक्ष आणि न्यायालयाला पटवून द्यावे अशी विनंती बोत्स्वाना सरकारने केली आहे. यासाठी बोत्स्वाना सरकारच्या प्रतिनिधीमंडळाने नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली आणि ईव्हीएमचे सॅम्पल मागवले आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्स’ची ती बातमी इथे सविस्तर आहे.
हिंदुस्थानच्या ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी २०१७ ला बोत्स्वानामध्ये ईव्हीएम हॅकाथॉनचे आयोजक करण्यात आले होते. २०१७ मध्ये अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. बोत्स्वानाच्या हॅकाथॉनचा दाखला देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंदुस्थानातही ईव्हीएमची सार्वजनिकरित्या चाचणी घेण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान बोत्स्वानामधील वर्तमान पत्रात आणि तिथल्या अनेक नामांकित न्यूज पोर्टलवर हे विषय मोठ्या प्रमाणावर उचलण्यात आले होते. विशेष म्हणजे या ईव्हीएम मशिन्स मोदी सरकारच्या कार्यकाळातच पुरविण्यात आल्या आहेत. बोत्स्वानामधील संबंधित बातम्या इथे वाचाव्या.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		